Shreya Maskar
मुलींना नेहमी सुंदर दिसायला, नटायला खूप आवडते. त्यामुळे त्यांच्या त्वचेची काळजी घेणारे स्किन केअर किट गिफ्ट करा. यात क्लिंझर, मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन हे आवश्यक घटक असतात.
आजकाल बाजारात ब्रेसलेट टाइप वॉचचा ट्रेंड सुरू आहे. हे गिफ्ट पाहताच तुमची मैत्रीण खूप खुश होईल. यात अनेक व्हरायटी पाहायला मिळतात.
स्वस्तात मस्त आणि भरपूर व्हरायटी असलेले गिफ्ट म्हणजे साडी, ड्रेस. तुम्ही एखाद्या छान रंगाची साडी भेट करा. मुलींना पाहता क्षणी आवडेल.
मुलींना ज्वेलरी खूप आवडते. त्यामुळे तुम्ही ऑक्सिडाइज ज्वेलरी गिफ्ट करा. कारण ती सर्व लूकवर खूपच सुंदर दिसते. तसेच या ज्वेलरीचा सध्या ट्रेंड सुरू आहे.
तुम्ही छान बॅग गिफ्ट करू शकता. यात हँडबॅग, बॅकपॅक,स्लिंग बॅग, क्रॉसबॉडी बॅग ,क्लच , बकेट बॅग, डफेल बॅग यांसारख्या बॅगचा समावेश आहे.
महिलांना होम डेकोरेशन खूप आवड असते. त्यामुळे होम डेकोरची एखादी वस्तू गिफ्ट करा. किंवा तुम्ही त्यांच्या desk वर ठेवण्यासाठी देखील सुंदर भेटवस्तू देऊ शकता.
मेकअपमुळे महिलांचे सौंदर्य खुलून येते. त्यामुळे एखादे चांगले ब्रँडेड प्रोडक्ट गिफ्ट करा. उदा. लिपस्टिक, आयलायनर
मुलींना फॅन्सी मोबाईल कव्हर खूप आवडतात. त्यामुळे हा देखील गिफ्टसाठी चांगला पर्याय आहे. तसेच मोबाइल कव्हर कमी पैशात देखील मिळेल.