Hair Tips : बोअरवेलच्या पाण्याने केस खराब झालेत; या टिप्स ठरतील फायदेशीर

Damage Hair : गाळून, उकळून किंवा विविध प्युरिफाइड्सचा वापर करून त्याचे सेवन करतो. त्याचप्रमाणे आपण अंघोळीसाठी आणि केस धुण्यासाठी वापरत असलेलं पाणी सुद्धा चांगलं असणे गरजेचं आहे.
Damage Hair
Hair TipsSaam TV
Published On

केस गळण्याच्या समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत. केस खराब झाल्याने प्रत्येक व्यक्तीच्या सौंदर्यात सुद्धा बदल होतो. केस खराब होण्याची अनेक कारणे आहेत. यामध्ये फास्टफूडचे सेवन, केमिकलयुक्त प्रोटक्ट्स वापरणे अशा अनेक समस्या आहेत. त्यामुळे व्यक्ती प्रोडक्ट तसेच डायेटमध्ये बदल करतात. मात्र तरी देखील केसांच्या समस्या काही कमी होत नाहीत. त्यावेळी केस खराब होण्याचं कारण असतं घरी येणारं बोअरवेलचं पाणी. त्यामुळे देखील केस जास्त प्रमाणात खराब होतात.

Damage Hair
Natural Hair Dye : केस पांढरे झाल्याने टेन्शन आलंय? मग लोखंडी कढईत घरीच बनवा गावरान हेअर डाय

खाऱ्यापाण्याने केस का खराब होतात?

आपण हेल्दी राहण्यासाठी बोअरवेलचं पाणी असलं तरी ते गाळून, उकळून किंवा विविध प्युरिफाइड्सचा वापर करून ते पिण्यासाठी वापरतो. त्याचप्रमाणे आपण अंघोळीसाठी आणि केस धुण्यासाठी वापरत असलेलं पाणी सुद्धा चांगलं असणे गरजेचं आहे. बोअरवेलच्या पाण्यात जास्तप्रमाणात क्षार तसेच सोडियम, कैल्शियम आणि मॅग्नेशिअम असतात. त्यामुळे याचा आपल्या त्वचेवर आणि केसांवर गंभीर परिणाम होतो.

या पद्धतीने घ्या केसांची काळजी

पाणी उकळून घ्या

तुमच्या घरी देखील क्षारयुक्त पाणी येत असेल तर आधी ते पाणी उकळवून घ्या. गरम पाण्याशिवाय केस धुवू नका. पाणी उकळून घेतल्याने त्यातील क्षाराचं प्रमाण कमी होतं. तसेच केसांना जास्त त्रास होत नाही.

केसांना तेल अप्लाय करा

जेव्हा जेव्हा केसांच्या समस्या जाणवतात तेव्हा केसांना जास्त ऑयलिंग करत जा. तसेच क्षारयुक्त पाण्याने जर तुम्ही हेअरवॉश करत असाल तर त्याआधी केसांना तेल लावा. तेल लावल्याने केसांच्या मुळांवर थेट क्षारयुक्त पाण्याचा परिणाम होणार नाही.

केसांत दही अप्लाय करा

दही आपल्या केसांसाठी फार चांगलं असतं. त्यामुळे केसांची मुळं मजबूत व्हावीत आणि केस जास्त गळू नयेत त्यासाठी केसांवर दही अप्लाय करा. दहीमध्ये ऑलिव्ह ऑइल आणि मध मिक्स करा. त्यानंतर केस धुण्याआधी हे मिश्रण केसांवर अप्लाय करा.

Damage Hair
Long Hair Tips: लांब आणि सरळ केसांसाठी लावा स्वयंपाकघरातील 'हा' पदार्थ

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com