Shreya Maskar
दही आपल्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे आहे.
दह्यापासून बनलेले पदार्थ खाल्ल्यास आपली पचनक्रिया सुरळीत होते.
नियमित दही बाहेरून विकत घेण्यापेक्षा घरी बनवणे कधीही उत्तम राहते.
घरी दही बनवताना ते जास्त आंबट होणार नाही याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.
जास्त प्रमाणात दह्याला विरजण लावल्यास दही आंबट होण्याची शक्यता वाढते.
घरी लावलेले दही आंबट झाल्यास 'अशा' पद्धतीने आंबटपणा कमी करा.
दही आंबट झाल्यास दह्यामधील जास्त पाणी काढून घ्या.
पाणी काढलेल्या दह्यामध्ये ताजे थंड दूध घाला.
दूध घातलेले दही फ्रिजमध्ये ३० मिनिट ठेवा आणि त्यानंतर दह्याचा आस्वाद घ्या.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. साम टिव्ही या माहितीचे समर्थन करत नाही.