Siddhi Hande
आज संपूर्ण देशभरात अंगारकी चतुर्थी साजरी केली आहे. आज अनेकांचे उपवास असतात.
उपवासाच्या दिवशी साबुदाण्याची खिचडी, रताळ्याचा किस, बटाट्याचे वेफर्स खाऊन कंटाळा येतो.अशावेळी तुम्ही उपवासाचे थालीपीठ बनवू शकतात.
उपवासाचे थाळीपीठ चविष्ट असते. त्याचसोबत उपवासाचे थालीपीठ खालल्याने जास्त भूक लागत नाही.
उपवासाचे थालीपीठ बनवण्यासाठी सर्वप्रथम साबुदाणे भिजत ठेवा.
थालीपीठ बनवण्यासाठी बटाटा, उपवासाची भाजपी, शेंगदाण्याचा कूट, हिरव्या मिरच्या, आलं, जीरे, दही, साखर, मीठ हे साहित्य आवश्यक आहे.
सर्वप्रथम मिक्सरमध्ये आलं, मिरची आणि जीरे बारीक करुन घ्यावे.
त्यानंतर एका बाउलमध्ये उकडलेला बटाटा, साबुदाणा, भाजणी, दाण्याचा कूट, आलं मिरची पेस्ट, दही, मीठ आणि थोडी साखर टाकून मिक्स करुन घ्यावे.
यानंतर या मिश्रणाचे लहान लहान गोळे करावेत. हे गोळे प्लास्टिकच्या पिशवीवर किंवा फॉइल पेपरवर थापून घ्यावे.
त्यानंतर तव्यावर तेल टाकून मस्त खरपूस भाजून घ्यावे.