Siddhi Hande
पावसाळ्यात नेहमी काहीतरी चटकदार आणि कुरकुरीत पदार्थ खाण्याची इच्छा होते.
पावसाळ्यात तुम्ही पौष्टिक आणि खमंग कोथिंबीर वडी बनवू शकतात.
कोथिंबीर वडी बनवण्यासाठी सर्वप्रथम कोथिंबीर स्वच्छ धुवून घ्यावी. त्यानंतर कोथिंबीर एकदम बारीक चिरावी.
यानंतर मिक्समध्ये मिरची, आलं लसूण पेस्ट, गरम मसाला, हळद, मीठ, जिरे टाकून वाटून घ्यावे.
यानंतर चिरलेली कोथिंबीर आणि मिक्समध्ये बारीक केलेले मिश्रण एकत्रित मिक्स करावे. त्यात बेसन आणि तांदळाचे पीठ टाकावे.
यानंतर कोथिंबीर वडी वळून घ्यावी. ही कोथिंबीर वडी कुकरमध्ये किंवा उकडीच्या भांड्यात ठेवावी.
थोडा वेळ कोथिंबीर वडी उकडल्यानंतर थंड होण्यासाठी ठेवाव्यात.
वडी थंड झाल्यानंतर बारीक काप करावे. यानंतर वड्या तेलात फ्राय करुन घ्याव्यात.