Alu Vadi Recipe: घरच्या घरी १० मिनिटांत बनवा खमंग, खुसखुशीत अन् चवदार अळूवडी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अळूवडी

अळूवडी ही सर्वांनाच आवडते. आज आम्ही तुम्हाला अळूवडीची रेसिपी सांगणार आहे.

Alu Vadi Recipe | Google

अळूची पाने

सर्वप्रथम अळूची पाने स्वच्छ धुवून घ्यावीत. त्यातील मधले देठ कापूर टाका.

Alu Leaves | yandex

लसूणची पेस्ट

यानंतर एका बाउलमध्ये डाळीचे पीठ, तांदळाचे पीठ, तिखट, मीठ, तीळ, हिरवी मिरची आणि लसूणची पेस्ट टाका.

besan | Google

मिश्रण

पीठाच्या मिश्रणात आवश्यकतेनुसार पाणी टाका. मिश्रण जास्त पातळ होणार नाही याची काळजी घ्या.

Besan | Saam TV

कृती

यानंतर मोठ्या ताटात एका पानावर पीठाचे मिश्रण लावा. हे मिश्रण लावल्यावर वरुन अजून एक पान ठेवा.

Alu Vadi Recipe | Google

एकावर एक पाने ठेवा

त्यानंतर ७-८ पानांना एकावर एक पाने ठेवून त्याला पीठ लावून घ्यावे.

Alu Vadi Recipe | Google

कुकर

यानंतर अळूवडीला रोल करुन ते कुकरमध्ये ठेवावे.

Alu Vadi Recipe | Google

अळूवडी खरपूस तळून घ्या

कुकरच्या २-३ शिट्ट्या घेऊन गॅस बंद करावा. यानंतर थंड झाल्यावर त्याच्या वड्या पाडाव्यात. त्या तेलान खरपूस तळून घ्या.

Alu Vadi | Canva

Next: दूध भात खाण्याचे शरीराला आहेत फायदे; जाणून घ्या

Dudh Bhat Benefits | Google
येथे क्लिक करा