Siddhi Hande
अनेकजण जेवणात दूध भात खातात. दूध भात पचायला हलका असतो. त्याचसोबत पौष्टिकही असतो.
दूध भात खाण्याचे शरीराला अनेक फायदे आहेत.
दूध भात खालल्याने झोप चांगली येते. दुध भात खालल्याने मेंदू शांत राहतो. त्यामुळे शरीराला आराम मिळतो.
दूधात कॅल्शियम असते. कॅल्शियममुळे हाडे मजबूत होतात. त्यामुळे सांधेदुखीसारखे आजार होत नाही.
दूध हे दातांसाठी फायदेशीर असते. दूधामुळे दात मजबूत होतात. दूध भात खालल्याने तुमच्या हिरड्या मजबूत होतात.
दूधात भरपूर फायबर असते. त्यामुळे तुमची पचनक्रिया चांगली राहते. परिणामी पोटाशीसंबंधित समस्या दूर होतात.
दूध भात खालल्याने बराच वेळ पोट भरल्यासारखे वाटते. त्यामुळे भूक लागत नाही.
दूधात कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम असते. त्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो.