Siddhi Hande
पावसाळ्यात सर्वांना कुरकुरीत भजी खाण्याची इच्छा होते. पावसाळ्यात तुम्ही ओव्याच्या पानांची भजी खाऊ शकता.
ओव्याच्या पानांची भजी बनवण्यासाठी ओव्यातची पाने, बेसन पीठ, तांदळाचे पीठ, लाल तिखट, मीठ, धणे पावडर, जिरे पावडर, सोडा, तेल ही साम्रगी आवश्यक आहे.
सर्वप्रथम ओव्याची पाने स्वच्छ धुवून घ्या.
एका बाउलमध्ये बेसन पीठ, तांदळाचे पीठ, मीठ, तिखट, धणे, जिरे पावडर एकत्रित मिक्स करा. त्यात आवश्यक तितके पाणी टाका.
त्यानंतर कढईत तेल गरम करा. ओव्याचे एक एक पान बेसन पीठात बुडवा. त्यानंतर गरम तेलात तळून घ्या.
हे भजी तुम्ही चटणीसोबत किंवा सॉससोबत खाऊ शकतात.
ओव्याचे भजी चवीला खूपच चविष्ट असतात. त्याचसोबत शरीरासाठी पौष्टिक असतात.