आजकाल कमी वयामध्ये केस पांढरे होण्याची समस्या दिवसेंदिवस वाढत जात आहे. आपल्याला वयाच्या २० - २५ वर्षानंतरही केस पांढरे होताना दिसून येतात. यामागे पोषक तत्वांचा अभाव, जंक फूडचे सेवन, खराब जीवनशैली आणि वाढते प्रदूषण ही कारणे आहेत.
बाजारात मोठ्या प्रमाणात केस काळे करण्याचे प्रोडक्ट उपलब्ध आहेत. मात्र हे प्रोडक्ट महाग तसेच यांमध्ये वापरलेली रसायने आरोग्यास घातक ठरतात. काही वेळा या प्रोडक्टमुळे केस गळती होऊन केस खराब होतात. केसांची चमक निघून जाते. यामुळे आपण घरातच प्रभावी उपाय करून पांढरे केस काळे करू शकतो. यासाठी तुम्हाला रोजच्या जेवणातील काही पदार्थ मदत करतील.
मेथी पावडर
पांढरे केस दूर करण्यासाठी तुम्ही मेथीचा वापर करू शकता. मेथीमुळे केस काळे आणि मजबूत होतात. मेथीचे तेल तयार करण्यासाठी तुम्हाला नारळाचे तेल, मेथी, एलोवेरा जेल , काळे तीळ, कढीपत्ता, कडुलिंबाची पाने, तुळशीची पाने, जास्वंदीची फुले, लवंग आणि कांदा इत्यादी साहित्य लागते.
कृती
सर्वप्रथम मेथीचे दाणे भिजवून छान वाळवून घ्या. त्यानंतर याची बारीक पावडर करून घ्या. एका पॅनमध्ये थोडे नारळाचे तेल , मेथी पावडर, काळे तीळ आणि कांदा टाकून गरम करून घ्या. त्यावर कढीपत्ता, कडुलिंबाची पाने, तुळशीच्या पानांची फोडणी द्या. हे मिश्रण एकत्र झाल्यावर त्यामध्ये जास्वंदीची फुले, एलोवेरा जेल आणि लवंग टाकून मिक्स करून घ्या. हे तेल १५ ते २० मिनिटे छान उकळू द्या. गाळणीच्या साहाय्याने तेल गाळून हवाबंद बॉटलमध्ये स्टोर करून ठेवा. आठवड्यातून २ ते ३ वेळा या तेलाने केसांना मालिश केल्यास पांढरे केस काळे होतात.
चहा पावडर
चहा बनवण्यासाठी वापरण्यात येणारी चहा पावडर केस काळे करण्यास मदत करते. चहा पावडर मधील नैसर्गिक गुणधर्म केस मजबूत करून केसांना चांगले पोषण देते. केसांची चमक वाढवते. पाण्यामध्ये चहा पावडर घालून छान उकळून घ्या. हे मिश्रण थोडे घट्ट झाल्यावर केसांना हलक्या हाताने मसाज करा. केस ३० मिनिटांनी स्वच्छ पाण्याने धुवा. आठवड्यातून २ वेळा अशा पद्धतीने केस धुतल्यास डोक्यावर पांढरे केस उरणार नाही.
काळी मिरी
काळी मिरी जेवणाची चव वाढवते. हीच काळी मिरी केसांचे आरोग्य देखील उत्तम ठेवण्यास मदत करते. सर्वप्रथम काळी मिरीची पावडर बनवून घ्या. त्यामध्ये लिंबाचा रस आणि थोड दही टाकून छान मिक्स करून घ्या. ही पेस्ट केसांच्या मूळांना ३० मिनिटे लावून ठेवा आणि केस नैसर्गिक शॅम्पूने स्वच्छ धुवा. हा उपाय तुम्ही आठवड्यातून २ वेळा करू शकता.
टीप : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.