बाजारात सध्या मेथीची आवक वाढली आहे. त्यामुळे मेथीच्या भाजीचे दर कमी झालेत. ज्या सिजनमध्ये ज्या भाज्या जास्त येतात त्या खाव्यात. कारण प्रत्येक भाजीमध्ये पौष्टीक घटक असतात. अशात मेथी या पालेभाजीमध्ये देखील पैष्टीक घटक आहेत. मात्र अनेक व्यक्ती ही भाजी खात नाहीत.
बऱ्याच जणांना मेथीची चव आवडत नाही. मेथी थोडी कडवट लागते असं काही जण म्हणतात. लहान मुलं देखील मेथीची भाजी खाण्यास कंटाळा करतात. त्यामुळे आज मेथीच्या भाजीपासून बनवलेले पैष्टीक पराठे कसे बनवायचे याची माहिती जाणून घेऊ.
मेथीचे पराठे बनवण्याची रेसिपी फार सिंपल आणि सोप्पी आहे. यासाठी घरातील निवडक साहित्य वापरून अवघ्या १० मिनिटांत तुम्ही मेथीचे पराठे बनवू शकता.
सामग्री
गव्हाचं पीठ
मीठ
मेथी
लसून
जीरे
हळद
पाणी
तेल
हिरव्या मिरच्या किंवा लाल तिखट
कृती
मेथीचे पराठे बनवण्यासाठी सुरुवातीला पीठाची कणीक मळून घ्या. कणीक मळताना त्यामध्ये तिखट, मीठ, हळद सुरुवातीला टाका. तिखट म्हणून तुम्ही हिरवी मिरची वापरणार असाल तर मिरची बारीक चिरून किंवा मिक्सरला बारीक करून टाका. त्यानंतर पीठात मेथीची भाजी बारीक चिरून टाका. सर्व सामग्री टाकल्यावर पिठात पाणी टाकून चांगली कणीक मळून घ्या.
तयार कणीक ५ ते १० मिनिटे झाकून ठेवा. नंतर त्याचे समान आकाराचे गोळे करा. तयार गोळ्यांची पोलपाट आणि लाटन्याच्या सहाय्याने पोळी लाटून घ्या. त्यानंतर लाटलेली पोळी तव्यावर शॅलोफ्राय करून घ्या. शॅलोफ्रॅय करताना तुम्ही पराठ्याला तेलही लावू शकता.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.