आजकालच्या फॅशनेबल जगात सध्या टॅटू काढण्याचा ट्रेंड वाढत चाला आहे. अनेक लोक विविध आकाराचे, रंगाचे, चिन्हांचे टॅटू शरीरावर काढतात. पण हेच टॅटू काढताना आपण काही गोष्टींची विशेष काळजी न घेतल्यास संसर्गाचा धोका वाढतो. ज्या लोकांना मधुमेह, किडनी आणि हृदयाच्या समस्या असल्यास टॅटू काढू नये. स्टाइलसाठी काढलेला टॅटू आरोग्याला नुकसान पोहचवू शकतो.
आजारांना आमंत्रण
टॅटू काढण्यासाठी जी शाई वापरण्यात येते त्यामध्ये मोठ्या प्रमाणात रसायने आढळून येतात. या रसायनांमुळे त्वचेला संसर्ग होण्याचा धोका वाढतो. टॅटू काढताना वापरल्या जाणाऱ्या सुई आणि शाईचा दर्जा चांगला नसल्यास रोगप्रतिकार शक्ती कमकुवत होते. कधी कधी टॅटू काढलेल्या जागी खाज येते. तसेच पुरळही उठते. अशा त्वचेचा अनेक समस्या उद्भवतात. शरीरावर टॅटू काढल्यामुळे अनेक आजारांना आमंत्रण मिळते. टॅटूमुळे हेपिटायटिस बी चा धोका वाढतो. कधीही टॅटू काढताना नवीन सुई वापरली जाईल याची काळजी घ्यावी. कारण चुकीच्या सुईच्या वापरामुळे एचआयव्हीची लागण होऊ शकते. तसेच शरीरावर टॅटू काढल्यामुळे त्वचेचा कर्करोग होण्याचा धोका वाढतो.
स्नायूंना दुखापत
टॅटू काढण्यासाठी वापरण्यात येणारी सुई चुकून शरीरात खोलवर घुसल्यामुळे स्नायूंचे आरोग्य धोक्यात येते. एकापेक्षा जास्त वेळा तीच सुई वापल्याने संसर्गाचा धोका वाढतो.
टॅटू एक्सपर्ट
आजकाल बाजारात कमी पैशांमध्ये टॅटू काढून देणाऱ्यांची संख्या वाढत चाली आहे. अशात टॅटू काढायचा असल्यास एक्सपर्टकडे जाऊन टॅटू काढावा. कारण टॅटू एक्सपर्ट चांगल्या प्रकारची सुई, मशीन आणि इतर साधने वापरतात. ज्यात शरीराला धोका कमी असतो.
टॅटू काढताना काळजी घ्या
टॅटू काढणाऱ्या व्यक्तींनी हातामध्ये हातमोजे घालणे महत्वाचे आहे. तसेच टॅटू काढण्याचे ठिकाणही स्वच्छ असणे गरजेचे आहे.
टीप : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.