Saif Ali Khan- Kareena Kapoor: सैफ अली खान-करीना कपूरच्या नात्यात दुरावा? अभिनेत्याने मिटवला बायकोच्या नावाचा टॅटू

Saif Ali Khan Remove Kareena Kapoor Tattoo Name: बॉलिवूडमधील सैफ अली खान आणि करीना कपूर हे प्रसिद्ध बॉलिवूड कपल आहे. सैफ अली खान आणि करीना कपूर नेहमीच चर्चेत असतात. ते अनेकदा पापाराझींसमोरदेखीस पोझ देत असतात.
Saif Ali Khan- Kareena Kapoor
Saif Ali Khan- Kareena KapoorSaam Tv

बॉलिवूडमधील सैफ अली खान आणि करीना कपूर हे प्रसिद्ध बॉलिवूड कपल आहे. सैफ अली खान आणि करीना कपूर नेहमीच चर्चेत असतात. ते अनेकदा पापाराझींसमोरदेखीस पोझ देत असतात. सैफ अली खान आणि करीना कपूर यांचे एकमेकांवर खूप प्रेम आहे. त्यांच्या कृतीतून ते नेहमी दाखवून देत असतात. सैफ अली खानने करीना कपूरसाठी हातावर टॅटू काढला होता. करीनाचा हा टॅटू त्यांच्या प्रेमाचे चिन्ह असल्याचे बोलले जात असायचे. मात्र, सैफ अली खानने आता हा टॅटू काढून टाकला आहे.

सैफ अली खानने करीनाच्या नावाचा टॅटू काढला होता. त्याने आता या टॅटूला वेगळाच आकार दिला आहे. सैफ अली खानने हातावरील टॅटूचे रुपांतर त्रिशुळात केले आहे. त्याने हातावर त्रिशूळाचा टॅटू काढला आहे. याचाच फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

सैफ अली खानने करीना कपूरच्या नावाचा टॅटू काढून टाकल्यामुळे सोशल मीडियावर वेगवेगळ्या चर्चा होत आहेत. सैफ अली खान आणि करीनाच्या नात्यात दुरावा आल्याचेदेखील बोलले जात आहे. सैफ अली खानच्या टॅटूचा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी या फोटोंवरुन त्यांच्या नात्यात दुरावा असल्याचा अर्थ लावला आहे.

सैफ अली खानच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. सैफ अली खान आता तिसरं लग्न करणार का? तुमच्या नात्यात काही दुरावा आहे का? तुमचं सगळं ठिक सुरु आहे ना? अशा कमेंट्स या फोटोवर आल्या आहेत.

Saif Ali Khan- Kareena Kapoor
Shashank Ketkar Video: कार्यकर्त्यांचे फोटो बघण्यात इंटरेस्ट नाही...घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेवरुन अभिनेता शशांक केतकर भडकला

सैफ अली खानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, तो लवकरच देवरा या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. करीना कपूर बद्दल बोलायचे तर, ती काही दिवसांपूर्वीच क्रू या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती.

Saif Ali Khan- Kareena Kapoor
Tharla Tar Mag: सायली अर्जुनमधील कॉन्ट्रॅक्ट मॅरेज संपणार का? 'ठरलं तर मग' मालिकेचा नवा प्रोमो प्रदर्शित

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com