Saif Ali Khan: सैफ अली खान कोकीलाबेन रुग्णालयात दाखल, गुडघा आणि खांद्यांवर शस्त्रक्रिया; नेमकं काय घडलं?

Saif Ali Khan Hospitalized: सैफ अली खानसोबत त्याची पत्नी अर्थात बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान देखील रुग्णालयात आहे. सैफ अली खान रुग्णालयामध्ये दाखल असल्याची माहिती कळताच त्याचे चाहते चिंतेत आले आहेत.
Saif Ali Khan
Saif Ali KhanSaam Tv

Saif Ali Khan Shoulder And Knee Factures:

बॉलिवूडचा (Bollywood) प्रसिद्ध अभिनेता सैफ अली खानला (Saif Ali Khan) रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सोमवारी सकाळी आठच्या सुमारास सैफ अली खानला कोकिलाबेन रुग्णालयात (Kokilaben Hospital) दाखल करण्यात आले असून त्याच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात येत आहे. अभिनेत्याच्या खांद्यालाही फ्रॅक्चर झाल्याचे सांगण्यात येत आहे.

सैफ अली खानसोबत त्याची पत्नी अर्थात बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान देखील रुग्णालयात आहे. सैफ अली खान रुग्णालयामध्ये दाखल असल्याची माहिती कळताच त्याचे चाहते चिंतेत आले आहेत. ते त्याची हेल्थ अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. सैफच्या गुडघ्याला आणि खांद्याला दुखापत झाली आहे. पण त्याला ही दुखापत नेमकी कशामुळे झाली यामागचे कारण अद्याप समजू शकले नाही.

दैनिक भास्करच्या वृत्तानुसार, त्याच्या गुडघ्याला आणि खांद्याला फ्रॅक्चर झाले आहे. खान कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीने अभिनेत्याच्या दुखापतीबाबत अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही. सैफ अली खान सध्या साऊथ चित्रपट 'देवरा'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. ज्युनियर एनटीआर आणि जान्हवी कपूरच्या या चित्रपटात तो 'बहिरा'ची भूमिका साकारत आहे. सैफ अली खान शूटिंगदरम्यानच जखमी झाल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर उपचारासाठी त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असल्याचे सांगितले जात आहे.

सैफ अली खानसोबत चित्रपटाच्या सेटवर असा अपघात होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी 2016 मध्ये 'रंगून' चित्रपटाच्या सेटवरही त्याच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. त्यानंतरही त्याला कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याठिकाणी त्याच्या अंगठ्यावर छोटी सर्जरी करण्यात आली होती.

त्यासोबतच 'क्या कहना' चित्रपटातील एका सीनदरम्यान बाईक स्टंट करताना सैफ जखमी झाला होता. खंडाळ्यामध्ये चित्रपटाचे शूटिंग सुरू होते. पाऊस असल्याने शूटिंगच्या ठिकाणी खूप चिखल होता. अशामध्ये बाइकवर स्टंट करताना सैफ पडला. त्याच्या डोक्याला दुखापत झाली होती आणि 100 टाके पडले होते.

Saif Ali Khan
OTT Release: विकीचा 'सॅम बहादूर' आणि रणबिरचा 'अ‍ॅनिमल', OTT वर 'या' आठवड्यात रिलीज होणार हे चित्रपट-सीरिज

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com