Vikrant Massey ने हातावर कोरला मुलगा 'वरदान'च्या नावाचा क्यूट टॅटू, फोटो तुम्ही पाहिलात का?

Vikrant Massey Tattooed Son Name Vardaan: विक्रांत मॅसीने त्याच्या सोशल मीडिया हँडल इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्याने आपल्या मुलाच्या हातावर वरदानच्या नावाचे टॅटू काढले असल्याचे दिसत आहे.
Vikrant Massey  Tattooed Son Name Vardaan
Vikrant Massey Tattooed Son Name VardaanSaam Tv

Vikrant Massey Son Vardaan:

बॉलिवूड अभिनेता विक्रांत मेस्सी सध्या १२वी फेल चित्रपटाच्या यशाचा आनंद घेत आहे. विक्रांत मेस्सी आणि त्याची पत्नी शीतल ठाकूर सध्या पॅरेंटहुड जर्नी इन्जॉय करत आहेत. हे कपल याच वर्षी ७ फेब्रुवारीला आई-बाबा झाले. शीतल ठाकूरने मुलाला जन्म दिला. त्यांनी आपल्या मुलाचे नाव वरदान असे ठेवले. विक्रांतने नुकताच आपल्या हातावर मुलगा वरदानच्या नावाचे टॅटू काढले आहे. त्याने सोशल मीडियावर टॅटूचा क्युट फोटो शेअर केला आहे. हा टॅटू त्याच्यासाठी खूपच खास आहे.

विक्रांत मॅसीने त्याच्या सोशल मीडिया हँडल इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्याने आपल्या मुलाच्या हातावर वरदानच्या नावाचे टॅटू काढले असल्याचे दिसत आहे. इतकंच नाही तर अभिनेत्याने वरदानच्या नावासोबत त्याची जन्मतारीख 7-2-2024 हे देखील लिहिले आहे. यासोबत विक्रांतने वरदानच्या जन्माचं कौतुक करणारी नोट देखील लिहिली आहे.

हा फोटो शेअर करताना विक्रांत मॅसीने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'ॲडिशन किंवा ॲडिक्शन, मला दोन्ही आवडतात.' विक्रांत मेस्सीच्या या नवीन टॅटूचा फोटो सोशल मीडियावर खूप वेगाने व्हायरल होत आहे आणि चाहत्यांनाही तो खूप आवडला आहे. शीतलने काही दिवसांपूर्वीच आपल्या लाडक्या मुलाच्या रूमची खास झलक दाखवली होती. तिने वरदानच्या रूमच्या आतील बाजूची झलक दाखवली नाही. अभिनेत्रीने फक्त बाहेरून फोटो शेअर केला होता. तो फोटो शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये लिहिले होते की, 'माझा मुलगा मॉम युगमध्ये.'

Vikrant Massey  Tattooed Son Name Vardaan
असित मोदींच्या अडचणीत वाढ, Taarak Mehta Ka Ooltah Chashmah फेम जेनिफर मिस्त्रीने केला आणखी एक गंभीर आरोप

विक्रांत मेस्सीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, विक्रांत शेवटचा '12वी फेल' चित्रपटात दिसला होता. या चित्रपटासाठी विक्रांतचे खूप कौतुक झाले. त्याला या चित्रपटातील उत्कृ्ष्ट अभिनयासाठी अनेक पुरस्कारही मिळाले. आता '12वी फेल'नंतर विक्रांत मेस्सी 'द साबरमती रिपोर्ट'मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात अभिनेता साबरमती एक्स्प्रेसची वेदनादायक कथा मांडताना दिसणार आहे. याशिवाय तो लवकरच तापसी पन्नूसोबत 'फिर आयी हसीन दिलरुबा'मध्ये दिसणार आहे.

Vikrant Massey  Tattooed Son Name Vardaan
Alia Bhatt ने 'Crew' चित्रपट पाहिला, नणंद करीना कपूरचं केलं कौतुक, म्हणाली...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com