Alia Bhatt ने 'Crew' चित्रपट पाहिला, नणंद करीना कपूरचं केलं कौतुक, म्हणाली...

Alia Bhatt On Kareena Kapoor Khan: या चित्रपटालाही प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. चित्रपट पाहिल्यानंतर सर्वसामान्यांसोबतच बॉलिवूड सेलिब्रिटी देखील सोशल मीडियावर पोस्ट करत या चित्रपटाविषयची आपली प्रतिक्रिया देत आहेत.
Alia Bhatt On Crew Film
Alia Bhatt On Crew FilmSaam Tv

Alia Bhatt On Crew Film:

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan), क्रिती सेनॉन (Kriti Senon) आणि तब्बू (Tabu) स्टारर चित्रपट 'क्रू' (Crew Movie) 29 मार्च 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने अवघ्या दोन दिवसांत चांगला व्यवसाय केला आहे. या चित्रपटालाही प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. चित्रपट पाहिल्यानंतर सर्वसामान्यांसोबतच बॉलिवूड सेलिब्रिटी देखील सोशल मीडियावर पोस्ट करत या चित्रपटाविषयची आपली प्रतिक्रिया देत आहेत. नुकताच करीना कपूर खानचा चित्रपट पाहिल्यानंतर तिची'वहिनी' आलिया भट्टनेही सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. आलियाने तिन्ही स्टार्सचे कौतुक केले आहे.

आलिया भट्टने तिच्या सोशल मीडिया हँडल इन्स्टाग्रामवर याविषयीचा रिव्ह्यू शेअर केला आहे. आलियाने चित्रपटाचे पोस्टर शेअर करत या चित्रपटाची निर्माती एकता कपूर, रिया कपूर आणि त्यातील तीन प्रमुख अभिनेत्रींना टॅग केले आहे. यानंतर आलियाने कौतुक करत कॅप्शनमध्ये लिहिले की, 'या क्रूने बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवून दिली आहे. पडद्यावरील आणि बाहेरच्या सर्व अद्भुत महिलांचे खूप खूप अभिनंदन.'

Alia Bhatt Post On Crew
Alia Bhatt Post On CrewInstagram

यापूर्वी करीना कपूरने तिच्या सोशल मीडियावर क्रूची बॉक्स ऑफिस कमाई शेअर करत जल्लोष केला. तिने या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, 'रिया कपूर, एकता कपूर आणि माझ्यासोबत राउंड 2, जो 'वीरे दी वेडिंग'पासून सुरू झाला होता आणि आता 'क्रू'सोबत सुरू आहे. मी खूप भाग्यवान आहे की मी या सुंदर स्त्रियांशी जोडले आहे.'

Alia Bhatt On Crew Film
Sukh Kalale Serial: स्पृहा जोशीच्या 'सुख कळले' मालिकेत 'चला हवा येऊ द्या' फेम अभिनेत्रीची एन्ट्री

राजेश ए कृष्णन दिग्दर्शित करीना कपूर खान आणि तब्बू यांच्या मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. या चित्रपटाने अवघ्या दोन दिवसांत देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 20 कोटींहून अधिक कमाई केली आहे. त्याचबरोबर या चित्रपटाने वर्ल्डवाइड कलेक्शन चांगले केले आहे. परदेशातील लोकांना देखील हा चित्रपट खूप आवडला आहे. या चित्रपटाने 40 कोटींहून अधिक वर्ल्डवाइड कलेक्शन केले आहे.

Alia Bhatt On Crew Film
असित मोदींच्या अडचणीत वाढ, Taarak Mehta Ka Ooltah Chashmah फेम जेनिफर मिस्त्रीने केला आणखी एक गंभीर आरोप

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com