आपण सर्वात सुंदर दिसावं असं प्रत्येक तरुणीला वाटत असतं. त्यासाठी मुली विविध पद्धतीचे कॉस्मेटीक्स वापरतात. चेहऱ्याला पावडर, लिप्सटीक, फाउंडेशन यासह विविध प्रोडक्ट अप्लाय करतात. मात्र मेकअप करताना त्यांच्या हातून काही शुल्लक चुका घडतात आणि चेहरा खराब होऊ लागतो. त्याबद्दलच आज जाणून घेणार आहोत.
चेहरा आणि हात धुवून घ्या
मेकअप करताना सर्वात आधी चेहरा आणि हात दोन्हीही स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. चेहरा धुवून घेतल्याने त्यावर कोणत्याही प्रकारची धूळ नसते. तसेच ओपन फोर्स ओपन असतात आणि त्याने चेहऱ्यावर अॅक्ने तयार होत नाहीत. तसेच स्वच्छ चेहर्यावर मेकअप अगदी सहजपणे अप्लाय होतो.
नॉन-कोमिडोजेनिक प्रोडक्ट
नॉन-कोमिडोजेनिक प्रोडक्ट निवडल्याने चेहऱ्यावर मेकअप पूर्ण सेट होतो. असे प्रोडक्ट चेहऱ्यावरील ओपन पोर्समध्ये बसत नाहीत. ओपन पोर्समध्ये प्रोडक्ट गेल्याने चेहऱ्यावर अॅक्ने आल्याचं दिसतं. त्यामुळे तुम्ही मेकअपसाठी जे प्रोडक्ट वापरत असाल ते नॉन-कोमिडोजेनिक आहे का हे पाहून घ्या.
स्वच्छ मेकअप ब्रश
मेकअप काही मुली अगदी दररोज सुद्धा करतात. त्यामळे एकदा वापरलेला मेकअप ब्रश लगेच वॉश करून घ्या ब्रशवर प्रोडक्ट तसेच ठेवल्याने त्याचा इफेक्ट ब्रशवर होतो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या ब्रशने किंवा ब्लेंडरने प्रोडक्ट अप्लाय केल्याने चेहऱ्यावर पिंपल्स येण्यास सुरुवात होतो. त्यामुळे मेकअपआधी तुमचा ब्रश स्वच्छ करून घ्या.
मेकअप करून झोपू नका
कामाच्या व्यापामुळे अनेक महिलांना रात्री घरी येण्यासाठी उशिर होतो. घरी येण्यास उशिर झाल्यावर झोप सुद्धा जास्त आलेली असते. त्यामुळे काही महिला मेकअप साफ न करता झोपतात. मात्र झोपेत चेहऱ्यावर मेकअप असणे फार भयंकर आहे. मेकअप न काढता झोपल्याने डोळ्यांखाली काळी वर्तुळ येतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.