Bhaindar Railway Station
CCTV FootageSaam Tv

CCTV Footage : डोळे पुसले, हातात हात घेतले, रेल्वे ट्रॅकवर जाऊन झोपले; बाप-लेकाचा शेवटचा VIDEO

Bhaindar Railway Station : काल सकाळी भाईंदर रेल्वे स्थानकावर एक धक्कादायक घटना घडली. जिथे एका पिता-पुत्राने ट्रेन खाली येत जीवन संपवले आहे.
Published on

भाईंदर स्थानकात रेल्वेखाली येऊन पिता-पुत्राने काल आत्महत्या केल्याची धक्कादायक घडना घडली होती. आत्महत्या केलेले पिता-पुत्र वसईतील रहिवासी असून हरिश मेहता आणि जय मेहता असे त्यांची नावे होती. या घटनेने संपूर्ण संपूर्ण शहर हादरुन गेले होते. मात्र सध्या सोशल मीडियावर या घटनेने सीसीटीव्ही फुटेज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Bhaindar Railway Station
Chhatrapati Sambhajinagar Crime: दिवसाढवळ्या बँक मॅनेजरच्या घरात चोरी, अवघ्या वीस मिनिटात ९ तोळे सोने लंपास; CCTV Footage समोर

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवार ता.९ जुलै २०२४ अर्थात काल आत्महत्या केलेले पिता-पुत्र सकाळी भाईंदर रेल्वे स्थानकात आले होते. त्यानंतर ते भाईंदर रेल्वे(Railway) स्थानकातील फलाट क्रांर ६ वरुन दोघे मीरा रोडच्या दिशेने असलेल्या रेल्वे रुळांवरुन चालत गेले. काही वेळानंतर मीरा रोडच्या दिशेने येणाऱ्या लोकले त्यांना धडक दिली. यात जागीच मृत्यू झाला. मात्र सीसीटीव्हीमध्ये ते उतरुन चालत जात असल्याचे आपल्याला स्पष्टपणे दिसत आहे. त्यावरुन दोघांनी आत्महत्या केल्याचे दिसते. त्यानंतर रेल्वे पोलिसांनी दोघांचे मृतदेह ताब्यात घेतले असून शवविच्छेदनासाठी पाठवले त्यानंतर या घटनेचा तपास सुरु केला असता नैराश्यातून दोघांनी जीव संपवले असल्याचे समजते.

व्हायरल होत असलेल्या सीसीटीव्हीमध्ये काय?

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या सीसीटीव्ही(CCTV) फुटेजमध्ये आपल्याला भाईंदर रेल्वे स्थानकातील फलाट दिसून येत आहे. या फलाट आणि व्हिडिओत दिसणाऱ्या परिसरात आपल्याला जास्त प्रवाशी दिसून येत नाही. मात्र या व्हिडिओत काही वेळांनतर मेहता पिता-पुत्र एका दिशेने जात असताना दिसून येत आहे.

एकाच्या पाठीवर बॅग दिसून येते. या व्हिडिओत(Video) नीट पाहिले तर दोघेजण काही संभाषण करतानाही दिसून येत आहेत. त्यानंतर दोघे चालत चालत संपूर्ण फलाट उतरतात. मात्र जेव्हा ते फलाट उतरुन खाली उतरुन चालण्यासाठी जातात तेव्हा तुम्हाला दिसते की एक भरधाव वेगात लोकल ट्रेन येत आहे. ही लोकल ट्रेनला पाहून मेहता पिता-पुत्र रेल्वे रुळावर झोपतात. मात्र दुर्देवाने ट्रेनखाली येऊन दोघांचा जागीच मृत्यू होतो. संपूर्ण धक्कदायक घटना रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्हीमध्ये कैद होते.

Bhaindar Railway Station
CCTV Footage: धक्कादायक! टोलचे पैसे द्यायचे नव्हते, महिला कर्मचाऱ्याच्या अंगावर थेट चढवली कार; घटना CCTV कॅमेरात कैद

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com