काशी टोल प्लाझा येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. टोल नाक्यावर टोल मागितल्यावर एका महिला कर्मचाऱ्याला धडक दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही कार दिल्लीहून येत होती. यात महिला कर्मचारी गंभीर जखमी झाली आहे. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही थरारक घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे.
सोमवारी दुपारी दिल्ली मेरठ एक्सप्रेस वेवर असणाऱ्या काशी टोल प्लाझा येथे ही घटना घडली आहे. टोल प्लाझावर महिला कर्मचारी टोलचे पैसे घेण्यासाठी कार समोर उभी होती. कार ड्रायव्हरने टोलचे पैसे देण्यास मनाई केली. कारमधील तरुणांनी टोल कर्मचाऱ्यांना शिविगाळ केली. त्यानंतर त्यांनी महिला कर्मचाऱ्यांच्या अंगावर कार चढवली. जवळपास १०० मीटरपर्यंत त्यांनी टोल कर्मचाऱ्यांला फरफटत नेले. मनीषा चौधरी असे जखमी महिला कर्मचाऱ्याचे नाव आहे. त्यांना उपचारासाठी सीएससीमध्ये पाठवण्यात आले आहे.
याप्रकरणी कारच्या नंबरवरुन पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. यानंतर टोल नाक्यांवर पोलिस तैनात करण्याचा प्रस्ताव पाठवणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ही संपूर्ण घटना टोल नाक्यावरील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असून याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. टोल कर्मचाऱ्यांनी हे फुटेज पोलिसांना दिले आहे. याप्रकरणी कारचालकाविरोधात तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी योग्य कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.
याप्रकरणी उत्तर प्रदेशमधील काशी प्लाझाचे व्यवस्थापक अनिल शर्मा यांनी माहिती दिली आहे. दिल्लीहून आलेल्या कारने टोल कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन केले. टोल मागितल्यावर कारने महिला कर्मचाऱ्यावर कार चढवली. यात ती गंभीर जखमी झाली आहे. प्रशासनाने यावर योग्य कारवाई करावी. जेणेकरुन ही घटना पुन्हा घडू नये, असे त्यांनी सांगितले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.