Delhi News: ईव्हीएम आणि VVPAT प्रकरणी 'सर्वोच्च' निकालाला आव्हान! सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल, काय निर्णय होणार?

Supreme Court On EVM-VVPAT: सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालात त्रुटी असल्याचा दावा करत यासंबंधी पुनर्विचार करण्यासंदर्भातील ही याचिका आहे. यावर आता कोर्ट काय निर्णय घेणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
Delhi News: ईव्हीएम आणि VVPAT प्रकरणी 'सर्वोच्च' निकालाला आव्हान! सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल, काय निर्णय होणार?
Supreme Court:Yandex
Published On

दिल्ली, ता. १४ मे २०२४: सर्वोच्च न्यायालयाने वोटर व्हेरिफिएबल पेपर ऑडिट ट्रेल(VVPAT) आणि ईव्हीएमबाबात दिलेल्या निकालावर पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालात त्रुटी असल्याचा दावा करत यासंबंधी पुनर्विचार करण्यासंदर्भातील ही याचिका आहे. यावर आता कोर्ट काय निर्णय घेणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, 26 एप्रिल रोजी सुप्रीम कोर्टाने याप्रकरणी निकाल देत मतदान प्रक्रिया ईव्हीएमवरच पार पडेल अस म्हणत काही सूचना निवडणूक आयोगाला केल्या होत्या. मात्र या निकालाविरोधात याचिकाकर्त्यांनी कोर्टात रिव्ह्यू पीटिशन (पुनर्विचार याचिका) दाखल केली आहे. अरुण अग्रवाल यांनी ही याचिका दाखल केली असून त्यांनी सुप्रीम कोर्टाने निकाल देताना 2 मुद्यांकडे दुर्लक्ष केल्याचे म्हटले आहे.

या याचिकेनुसार सुप्रीम कोर्टाने दिलेल्या 26 एप्रिलच्या निकालात सिम्बॉल लोडिंग युनिट्स (symbol loading units) ची असुरक्षा आणि त्यांच्या लेखापरीक्षणाची आवश्यकतेकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. तसेच सुप्रीम कोर्टाने निकाल लागण्यास उशीर होईल असे म्हणणे योग्य नाही, असाही आक्षेप या याचिकेमध्ये घेण्यात आला आहे.

Delhi News: ईव्हीएम आणि VVPAT प्रकरणी 'सर्वोच्च' निकालाला आव्हान! सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल, काय निर्णय होणार?
Akola Crime: सिने स्टाईल थरार! दुकानातून बाहेर पडताच अडवलं, गाडीत टाकलं, अन्.. प्रसिद्ध व्यावसायिकाचे अपहरण; अकोल्यात खळबळ

दरम्यान, पुनर्विचार याचिकेवरील सुनावणी ही वरिष्ठ न्यायमूर्तींसमोर बंद कोर्टात होत असते. जर त्यात न्यायालयाला काही विचार करावा असे वाटले तरच पुन्हा त्यावर सुनावणी होते. मात्र आपलाच निकाल बदलण्याचा विचार कोर्ट खूप कमी वेळा करते. त्यामुळे या याचिकेवर कोर्ट काय निर्णय घेणार? याचिका पुन्हा ऐकत का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Delhi News: ईव्हीएम आणि VVPAT प्रकरणी 'सर्वोच्च' निकालाला आव्हान! सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल, काय निर्णय होणार?
Sanjay Raut Letter : 'नाशिकमध्ये ८०० कोटींचा घोटाळा, जनतेच्या पैशांची लूट'; संजय राऊतांचं थेट PM मोदींना पत्र

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com