Fish On Dombivli Station: डोंबिवली स्टेशन रेल्वे ट्रॅकमध्ये साचलेल्या पाण्यात दिसले मासे; मजेशीर VIDEO पाहून व्हाल थक्क

Mumbai Rain News Video: पावसामुळे डोंबिवली रेल्वे स्थानकात मोठं पाणी साठलं होतं. अगदी रेल्वे रुळ देखील पाण्याखाली गेले होते. त्यामुळे ट्रेन धिम्या गतीने आणि उशिराने धावत होत्या. रुळांवर साठलेल्या याच पाण्यात चक्क मासे आले आहेत.
Fish On Dombivli Station: डोंबिवली स्टेशन रेल्वे ट्रॅकमध्ये साचलेल्या पाण्यात दिसले मासे; मजेशीर VIDEO पाहून व्हाल थक्क
Fish On Dombivli Railway Station's TrackSaam TV
Published On

रविवारी रात्रभर झालेल्या पावसामुळे सोमवारी सकाळी मुंबईकरांची मोठी गैरसोय झाली. मुंबईमध्ये थोडा जास्त पाऊस पडला की सर्वत्र पाणी साठतं आणि मुंबईची लाइफलाइन असलेली लोकल सेवा पूर्णता ठप्प पडते. सोमवारी देखील अशीच परिस्थीती झाली होती. सोमवारी चाकरमान्यांची ट्रेनमुळे मोठी गैरसोय झाली. त्यावेळी झालेल्या गर्दीचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यातच आता एक मजेशीर व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

Fish On Dombivli Station: डोंबिवली स्टेशन रेल्वे ट्रॅकमध्ये साचलेल्या पाण्यात दिसले मासे; मजेशीर VIDEO पाहून व्हाल थक्क
Viral Video : हसावं की चिडावं! तरुणाचा हा आगाऊपणा बघा! जीवावर उदार होऊन पुराच्या पाण्यातून चालत निघाला, अन्...!

पावसामुळे डोंबिवली रेल्वे स्थानकात मोठं पाणी साठलं होतं. अगदी रेल्वे रुळ देखील पाण्याखाली गेले होते. त्यामुळे ट्रेन धिम्या गतीने आणि उशिराने धावत होत्या. रुळांवर साठलेल्या याच पाण्यात चक्क मासे आले आहेत. मासे मस्त या पाण्यात पोहत आनंद घेत आहेत. आधीच गर्दी आणि त्यात पाऊस यामुळे वैतागलेल्या व्यक्तींना हे मासे पाहून थोडा विरंगुळा मिळाला.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एकूण ४ मासे रुळांवर साठलेल्या पाण्यात पोहताना दिसत आहेत. मासे अगदी वेगळ्या ठिकाणी आल्याप्रमाणे आनंदात पोहत आहेत. पावसाळ्यात धबधब्यांवर अनेक चढणीचे मासे येतात. तेच मासे इकडे आलेत की काय असा प्रश्न येथील काही व्यक्तींना पडला आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी देखील विविध कमेंट केल्यात. तसेच हा व्हिडिओ मोठ्याप्रमाणात आता व्हायरल होत आहे.

व्हिडिओ पोस्टकरत त्यावर डोंबिवली लोकेशन टाकण्यात आलं आहे. तर डोंबिवली स्टेशन रेल्वेट्रॅकमध्ये साचलेल्या पाण्यात दिसले मासे, असं कॅप्शन सुद्धा या व्हिडिओवर देण्याच आलं आहे. एका नेटकऱ्याने कमेंटमध्ये म्हटलंय की, गावाकडील माणसं गावाला चडणीचे मासे येतील याची वाट बघतायत आणि मासे मुंबईला आलेत. तर थोडे दिवस थांबा पेंग्विन पण दिसतील, असंही एकाने कमेंटमध्ये म्हटलं आहे.

मुंबई आणि पावसाळा यांचं एक वेगळंच समीकरण आहे. पावसात कायम मुंबईमध्ये सखल भागांत पाणी साठतं. काल मुंबई, पुणे या शहरांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला होता. त्यामुळे शाळा देखील बंद होत्या. पावसातील मजामस्तीचे आणखी काही व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाले आहेत. एका व्हिडिओमध्ये एक व्यक्ती नदीवरील पाण्याखाली गेलेला पुल अगदी सहज पार करताना दिसत आहे.

Fish On Dombivli Station: डोंबिवली स्टेशन रेल्वे ट्रॅकमध्ये साचलेल्या पाण्यात दिसले मासे; मजेशीर VIDEO पाहून व्हाल थक्क
Water Storage in Pune Dam : पुणेकरांसाठी खुशखबर! खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठा झपाट्याने वाढला; वाचा ताजी आकडेवारी

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com