Surabhi Jayashree Jagdish
३१ डिसेंबरला मुंबईत बाहेर पडायचं म्हटलं की गर्दी, ट्रॅफिक हे ठरलेलेच आहे. पण थोडा विचार करून ठिकाण निवडलं, तर मुंबईतच शांत, निवांत आणि वेगळा अनुभव देणारी ठिकाणं सापडू शकतात.
अशा ठिकाणी तुम्ही न्यू इअर सेलिब्रेशन अगदी रिलॅक्स मूडमध्ये करू शकता. गर्दीपासून दूर राहून निसर्ग, शांतता आणि शहराचं वेगळं रूप पाहायला ही ठिकाणं योग्य ठरतात.
गोराई बीच हा ३१ डिसेंबरला तुलनेने कमी गर्दीचा पर्याय ठरतो. याठिकाणी शांत समुद्र, मोकळी हवा आणि निवांत वातावरण असतं. फेरीने जाण्याचा अनुभवही वेगळाच आणि मजेशीर असतो.
निसर्गाच्या सान्निध्यात सकाळचा वेळ घालवायचा असेल तर हे उत्तम ठिकाण आहे. ३१ डिसेंबरला पार्टीपेक्षा शांत भटकंतीला प्राधान्य देणाऱ्यांसाठी योग्य आहे. इतिहास, हिरवळ आणि शांतता एकाच ठिकाणी अनुभवता मिळतो.
मढ बीचपेक्षा आतील भाग अजूनही शांत आणि कमी गर्दीचा असतो. याठिकाणची जुनी घरं, चर्च आणि समुद्रकिनाऱ्याजवळची वाट निवांत वाटते. फोटोग्राफी आणि शांत फेरफटका मारायला छान पर्याय आहे.
वर्सोवाच्या आतल्या भागात संध्याकाळी शांत वातावरण अनुभवता येतं. मच्छीमार बोटी, सूर्यास्त यामुळे मन प्रसन्न करतो. मोठ्या पार्टीपासून दूर राहायचं असेल तर हा भाग योग्य आहे.
धार्मिक आणि ऐतिहासिक ठिकाणांमध्ये हा परिसर खूप शांत असतो. ३१ डिसेंबरला इथे फारशी गर्दी नसते. मनःशांती, शांतता आणि वेगळा अनुभव देणारं हे ठिकाण आहे.
अक्सा बीचच्या आतील बाजूला काही शांत कॅफे आहेत. मोठ्या पार्टीपेक्षा साधं जेवण आणि गप्पांसाठी योग्य ठिकाण आहे. गर्दी नको पण बाहेर जायचंय अशांसाठी हा उत्तम पर्याय ठरतो.