Saree Styling Tips SAAM TV
लाईफस्टाईल

Saree Styling Tips : साडीत जाड दिसता म्हणून नेसणे टाळता का? स्लिम लूकसाठी खास टिप्स

Fashion Tips : आजकाल अनेक महिला साडीमध्ये जाड दिसतात म्हणून साडी नेसण्याचे टाळतात. पण आता 'या' सोप्या टिप्स फॉलो करून तुम्ही स्लिम साडी लूक तयार करू शकता.

Shreya Maskar

महिलांचे साडीमध्ये सौंदर्य खुलून येते. अनेक महिलांना साडी नेसायला सुद्धा खूप आवडते. परंतु साडीत काही महिला जाड दिसतात म्हणून त्या साडी नेसणे टाळतात. साडीमध्ये स्लिम लूक हवा असेल तर काही गोष्टींची विशेष काळजी घेणे महत्वाचे आहे.

साडीची निवड कशी करावी?

  • तुमच्या शरीराच्या आकारानुसार आणि रंगानुसार कधीही साडीची निवड करावी.

  • हलक्या रंगाच्या साड्या शरीरावर आणि चेहऱ्याकडे अधिक लक्ष वेधून घेतात. तर गडद रंगाच्या साड्या तुमच्यापेक्षा रंग आणि डिझाइनकडे लक्ष वेधून घेतात.

  • स्लिम दिसण्यासाठी हलक्या फॅब्रिकची साडी निवडावी. उदा. शिफॉन, सॅटिन, जॉर्जेट या साड्या हलक्या तसेच नेसायला सोप्या असतात. यामुळे तुमच्या शरीराचा आकार छान उठून दिसतो.

  • साडी कधीही पातळ बॉर्डर असलेली निवडावी. त्यामुळे तुम्ही उंच आणि स्लिम दिसाल.

ब्लाउजची निवड कशी करावी?

  • साडीसोबत योग्य ब्लाउज निवडणेही गरजेचे आहे. साडीवर सहसा आपण अंबाडा घालतो. त्यामुळे ब्लाउजची बॅक साईट स्टायलिश असायला काहीच हरकत नाही.

  • डीप कट बॅक डिझाइनचा ब्लाउज तुम्ही घालू शकता. यामुळे तुमचा लूक छान दिसेल

  • तुम्हाला अजून स्लिम दिसायचे असल्यास लांब बाह्यांचा ब्लाउज घाला. यामध्ये तुम्ही उंच आणि स्लिम दिसाल.

  • स्लिम दिसण्यासाठी कधीही प्लेन ब्लाऊज घालावा. पण जर तुमची साडी प्लेन असेल तर बारीक प्रिंटेचा ब्लाऊज निवडावा.

पेटीकोटची निवड कशी करावी?

  • साडीमध्ये तुमची फिगर स्लिम दिसण्यासाठी पेटीकोटची निवड योग्य करणे महत्वाचे आहे.

  • शरीराला थोडे घट्ट बसणारे पेटीकोटची निवड करावी. यामुळे शरीराचे सौंदर्य खुलते.

  • पारदर्शक साडीसाठी मॅचिंग शिमरी पेटीकोट घालावा.

  • अपारदर्शक साड्यांसाठी साडीला मॅचिंग असा पेटीकोट निवडावा.

साडी कशी नेसायची खास टिप्स

  • बेंबीच्या वर सहसा साडी नेसणे टाळा. त्यामुळे पोट फुगलेले दिसते. स्लिम लूकसाठी साडी बेंबीच्या खाली नेसावी.

  • साडीत निऱ्या काढताना महिलांची खूप तारांबळ उडते. पण याच निऱ्या साडीची शोभा वाढवतात. त्यामुळे निऱ्या दीर्घकाळ नीट राहण्यासाठी सेफ्टी पिनने बांधाव्यात.

  • साडीवर तुम्ही पदर पिन केल्यास तुम्ही उंच आणि स्लिम दिसाल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Easy Rangoli Designs For Diwali: दिवाळीसाठी सोप्या 5 रांगोळ्या, डिझाईन्स आत्ताच सेव्ह करून ठेवा

राजेंनी पन्हाळ्याच्या पायथ्याशी काढला अफजल खानचा कोथळा; गोपीचंद पडळकरांनी बदलला छत्रपतींचा इतिहास

Government Scheme: ऐन दुष्काळात राज्य सरकारचा मोठा निर्णय! सरकारची महत्त्वकांक्षी योजना बंद

बॅलेट पेपरवर निवडणुका अन् काँग्रेस शून्यावर; NDA किती जागांवर विजयी?

राजू शेट्टींना अटक होण्याची शक्यता; एकीकडे चर्चा सुरू असतानाच आंदोलनस्थळी पोलीस फौजफाटा वाढवला

SCROLL FOR NEXT