Beauty Tips : रात्री झोपण्यापूर्वी नाभीमध्ये टाका 'हे' आयुर्वेदिक तेल; सकाळी उठताच चेहऱ्यावरील वांग होईल गायब

Black Pigmentation on Face : चेहऱ्यावर अचानक एक काळा डाग येतो, हा डाग हाळूहाळू वाढू लागतो. चेहरा खराब झाल्याने आपण बेचैन होतो, सतत जास्त व्यक्तींमध्ये जाण्याची देखील लाज वाटू लागते.
Black Pigmentation on Face
Beauty Tips Saam TV
Published On

ठरावीक वय वाढल्यानंतर काही व्यक्तींच्या चेहऱ्यावर विशेषता महिलांच्या चेहऱ्यावर वांग जास्त प्रमाणात येतं. वांग आलेलं चांगलं दिसत नाही. चेहऱ्यावर अचानक एक काळा डाग येतो, हा डाग हाळूहाळू वाढू लागतो. चेहरा खराब झाल्याने आपण बेचैन होतो, सतत जास्त व्यक्तींमध्ये जाण्याची देखील लाज वाटू लागते.

Black Pigmentation on Face
Black Tea Benefits: काळा चहा पिण्याचे जबरदस्त फायदे जाणून घ्या

चेहऱ्यावर वांग हे कपाळावर किंवा डोळ्यांच्या खाली अशा भागात येतं. आता तुम्हाला देखील ही समस्या आहे आणि यासाठी तुम्ही आजवर अनेक औषधे घेतलीत, मात्र अद्यापही तुम्हाला आराम पडलेला नाही. असे असेल तर आम्ही या समस्येवर तुमच्यासाठी एक रामबाण औषध शोधलं आहे. त्याबाबत अधिक माहिती या बातमीमधून जाणून घेणार आहोत.

मोहरीचं तेल

मोहरीच्या तेलात अनेक जीवनसत्व आणि व्हिटॅमीन असतात. त्यामुळे आपल्या आरोग्यासाठी हे तेल फार फायदेशीर आहे. ज्या व्यक्तींना चेहऱ्यावर वांग आहे त्यांनी रोज रात्री झोपताना मोहरीच्या तेलाचा रामबाण उपाय करावा. रात्री झोपण्याआधी आपल्या नाभीमध्ये मोहरीच्या तेलाचे दोन किंवा तीन थेंब टाकावेत. त्याने चेहऱ्यावरील वांग कमी होते आणि स्किन छान चकाकते.

नीम तेल

लिंबाची पाने फार कडू असतात. मात्र त्याचे आयुर्वेदात बरेच फायदे आहेत. जर तुम्ही याचे तेल देखील नाभीमध्ये टाकाल तर त्यानेही चेहऱ्यावरील वांग कमी होईल. तुमचं ब्लड सर्कुलेशन देखील याने व्यवस्थित होतं. तसेच चेहऱ्यावरील पिंपल्सच्या समस्या देखील दूर होतात.

दही

चेहऱ्यावर जर वांग आलं असेल आणि काही केल्या ते जात नसेल तर चेहऱ्यावर दही अप्लाय करा. दह्याने स्किन मुलायम होते, तसेच चेहऱ्यात असलेल्या स्किनच्या अन्य समस्या सुद्धा दूर होतात. एका बाऊलमध्ये आधी दही घ्या. त्यात लिंबाचा रस मिक्स करा. त्यानंतर हे मिश्रण चेहऱ्यावर अप्लाय करा. त्याने देखील स्किनवरील ताण तसेच डलनेस कमी होतो. तसेच चेहऱ्यावर आलेलं वांग सुद्धा कमी होतं.

Black Pigmentation on Face
Benefits of Black Paper: काळीमिरीला ब्लॅक गोल्ड का म्हंटलं जातं? जाणून घ्या काय आहेत काळी मिरीचे खाण्याचे फायदे?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com