Weight Loss Tips : वजन कमी करण्यासाठी गावठी उपाय; आठवडाभरात व्हाल स्लिम

Weight Loss Tips In Marathi : पाण्याच्या मदतीने देखील तुम्ही सडपातळ होऊ शकता. त्यासाठी पाण्यामध्ये अद्रक, जिरं दालचिनी, बडिशेप रात्रभर पाण्यात भीजत ठेवा. त्यानंतर सकाळी उठल्यावर हे पाणी प्या.
Weight Loss Tips
Weight Loss TipsSaam TV

बदलत्या लाईफस्टईलमुळे आपल्या आरोग्यावर त्याचा परिणाम होताना दिसत आहे. नागरिक सकाळी उशिरा उठतात आणि रात्री लवकर झोपत नाहीत. त्यामुळे त्यांना मधुमेह, उच्चरक्तदाब या आजारांनी ग्रासलं आहे. जेवणाच्या वेळा आणि आहारात असलेल्या पदार्थांमुळे तरुण मुला-मुलींचं वजन वाढत आहे.

Weight Loss Tips
How To Lose Weight: डाएट आणि जीम न करता वजन कमी करायचंय? ६ टिप्स फॉलो करा

जिभेचे चोचले पुरवताना वाढलेलं वजन कमी करण्यासाठी सर्वजण जीममध्ये धाव घेत आहेत. मात्र यातही काही जण जीमचे पूर्ण पैसे भरून सुद्धा अंगदुखीमुळे व्यायाम करण्याचा कंटाळा करत आहेत. त्यामुळे आधीच आपलं वजन वाढूनये यासाठी काय काळजी घ्यायला हवी याची माहिती जाणून घेऊ.

घरचं जेवण खा

आरोग्य तज्ज्ञांच्या मते वजन कमी करण्यासाठी घरी बनवलेले पदार्थ खाल्ले पाहिजे. तसेच वजन कमी करण्यासाठी सगळ्यात आधी फास्ट फूड खाणे टाळले पाहिजे. मैदा,साखर असलेले तेलकट पदार्थ खाणे देखील पूर्णपणे बंद केले पाहिजे. घरच्या जेवणात मोठ्याप्रमाणात पोषक तत्व असतात त्यामुळे बारीक व्हायचं असेल तर घरी बनवलेलं अन्न खा.

जास्तीत जास्त पाणी प्या

पाण्याच्या मदतीने देखील तुम्ही सडपातळ होऊ शकता. त्यासाठी पाण्यामध्ये अद्रक, जिरं दालचिनी, बडिशेप रात्रभर पाण्यात भीजत ठेवा. त्यानंतर सकाळी उठल्यावर हे पाणी प्या. याने तुम्हाला वजन कमी करण्यास मदत होईल. तुम्ही वजन कमी करण्यासाठी ग्रीन टी सुद्धा पिऊ शकता.

जेवण झाल्यावर बाहेर फिरा

जेवण झाल्यानंतर काही जण लगेचच झोपून घेतात. मात्र त्यामुळे जेवण पचत नाही. जेवण निट न पचल्याने त्याचे फॅट्समध्ये रुपांतर होते. त्यामुळे तुम्ही देखील जेवण झाल्यावर लगेचच बेडरुममध्ये झोपू नका. त्या आधी १० ते १५ मिनिटे बाहेर एक फेरफटका मारा किंवा शतपावली करा.

आहारत फळांचा समावेश करा.

फळांमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असते. फळ खाल्याने शरीरामध्ये विटामिन्स मिळते. सकाळ आणि संध्याकाळ नाश्त्यामध्ये फळ्यांचे सेवन करा. त्यामुळे तुम्हाला जास्त भूक लागणार नाही आणि बारीक होण्यास मदत होईल.

Weight Loss Tips
Akola Crime: सिने स्टाईल थरार! दुकानातून बाहेर पडताच अडवलं, गाडीत टाकलं, अन्.. प्रसिद्ध व्यावसायिकाचे अपहरण; अकोल्यात खळबळ

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com