Viral Video Of Gym Lady WorkOut
Viral Video Of Gym Lady WorkOutSaam Tv

GYM Viral Video: भारतीय नारी सर्वात भारी! तरुणीचा साडी नेसून जिममध्ये वर्क आऊट ;VIDEO व्हायरल

Viral Video: जिममध्ये वर्कआउट करताना जिम आउटफिट घातले जातात. परंतु तुम्ही कधी साडी नेसून वर्क आउट करताना पाहिलय का? एका तरुणीने साडी नेसून वर्क आउट केलं आहे. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
Published on

A lady Do Workout In Saree In Gym Video Viral:

सध्या बदलत्या जीवनशैलीमुळे लोकांच्या आहारावर परिणाम होत आहे. त्यामुळे लोक शरीर सृदृढ राहण्यासाठी पोषक आहार घेतात. तसेच अनेकजण जिममध्ये जातात. जिममधील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. जिममध्ये जाताना लोक जीम आऊटफिट घालून जातात. परंतु तुम्ही कधी साडी घालून जीममध्ये व्यायाम करताना पाहिलय का? असाच एक व्हिडिओ सोशळ मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. (Viral News In marathi)

जीममध्ये सामान्यतः जिम आऊटफिट, स्ट्रचेबल आणि हलके कपडे घालून जातात. जेणेकरुन व्यायाम करताना कोणताही त्रास होऊ नये. व्यायाम करताना खूप सोपे जावे यासाठी जीम आऊटफिट घालतात.तुम्ही कधी साडी घालून जिममध्ये व्यायाम केला आहे का? एका महिलेने चक्क जीममध्ये साडी नेसून व्यायाम केला आहे. एका महिलेचा जीममध्ये साडीमध्ये पुल अप करतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडिओत एक महिला जिममध्ये साडी नेसून वर्कआऊट करताना दिसत आहे. पांढऱ्या आणि लाल रंगाच्या साडीत तरुणी व्यायाम करत आहे. हे आयकॉनिक आहे, असं कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आलं आहे.

Viral Video Of Gym Lady WorkOut
Viral Video: एकीकडे ऑनलाईन लेक्चर अन् दुसरीकडे चुल्हीवरची भाकरी; शिक्षणासाठी लहान मुलाचा संघर्ष पाहून डोळ्यात आसवं दाटतील

none_dini_ या सोशल मीडिया अकाउंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. 'भारतीय नारी सर्वात भारी', 'उत्तम', 'साडीमध्ये वर्क आऊट करणे खूपच अवघड आहे', अशा कमेंट्स या व्हिडिओवर आल्या आहेत.

Viral Video Of Gym Lady WorkOut
Viral Video: बसच्या खिडकीवरून महिलांची फ्री स्टाईल हाणामारी! हातात चप्पल अन् ताई सुसाट;VIDEO व्हायरल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com