Viral Video: अनोखा जुगाड ! Roof To Roof फुटबॉल खेळणाऱ्या तरुणांचा व्हिडिओ व्हायरल

Viral News: देशाच्या कानाकोपऱ्यात वेगवेगळ्या खेळ खेळले जातात. यात क्रिकेट आणि फुटबॉल जास्त प्रमाणात खेळला जातो. फुटबॉल खेळण्यासाठी तीन तरुणांनी अनोखा जुगाड केला आहे. त्यांनी चक्क टेरेसवरुन फुटबॉल खेळला आहे.
Viral Video
Viral VideoSaam Tv
Published On

Roof To Roof Football Viral Video

देशात प्रत्येक कानाकोपऱ्यात वेगवेगळे खेळ खेळले जातात. देशात अनेक खेळाडू आहेत. खेळासाठी अनेक खेळाडूंनी खूप खडतर परिस्थितीत जीवन जगले आहे. तर काहींनी खूप जुगाड करत खेळ शिकले आहेत. असाच फुटबॉल खेळण्यासाठी जुगाड करणाऱ्या मुलांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Viral News In Marathi)

देशात क्रिकेट, फुटबॉलपासून ते अगदी विटी दांडू, लंपडाव असे सर्व खेळ खेळले जातात. अनेकजण जागा नसल्यावर जुगाड करत वेगवेगळ्या ठिकाणी खेळ खेळतात. अशीच शक्कल काही तरुणांनी लढवली आहे. तरुणांनी चक्क टेरेसवर फुटबॉल खेळला आहे.याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.

व्हायरल व्हिडिओत तीन मुले वेगवेगळ्या घरांच्या टेरेसवर उभी असलेली दिसत आहे. ही मुले आपापल्या टेरेसवरुन फुटबॉल खेळत आहेत. व्हिडिओत एक मुलगा टेरेसरुन दुसऱ्या टेरेसच्या दिशेने फुटबॉल फेकून मारतो. तर दुसऱ्या टेरेसवर उभा असलेला मुलगा तो फुटबॉल अजून एका मुलाकडे फेकून मारतो. त्यांचा हा गेम असाच सुरु असताना दिसत आहे. विशेष म्हणजे त्यांचा बॉल टेरेसवरुन कधीच खाली पडताना दिसत नाही.

Viral Video
Viral Video: सूनेच्या स्वागतासाठी सासूबाई दिलखुलास होऊन नाचल्या; भन्नाट डान्स VIDEO व्हायरल

Harsh Goenka या एक्स अकाउंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. फुटबॉल खेळण्यासाठी अनोखा जुगाड, हे फक्त भारतातच होऊ शकते, अशा कमेंट्स या व्हिडिओवर आल्या आहेत.

Viral Video
Viral Video : बटर पावभाजीला विसरा, आता गरमागरम बटर कुल्फी पाववर मारा ताव...; VIDEO व्हायरल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com