Tips for drinking water SAAM TV
लाईफस्टाईल

Tips For Drinking Water : उभं राहून पाणी पिणे आरोग्यासाठी खूपच धोकादायक; आताच सवय मोडा, अन्यथा होतील गंभीर आजार

Side Effects Of Drinking Water While Standing : धावपळीच्या जगात शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी पाणी पिणे गरजेचे आहे. पण हेच पाणी उभे राहून प्यायल्याने आरोग्यास घातक ठरते. जाणून घेऊयात उभे राहून पाणी प्यायल्याने शरीरावर काय परिणाम होतात.

Shreya Maskar

पाणी हे आपले जीवन आहे. आपल्या शरीराचा जास्तीत जास्त भाग पाण्याने व्यापलेला आहे. शरीराचे कार्य उत्तम चालण्यासाठी पाणी हा घटक महत्त्वाचा आहे. शरीरातील पाण्याच्या अभावामुळे अनेक आजारांना आमंत्रण मिळते.

पाणी हे शरीराला हायड्रेट ठेवण्यासोबतच शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढून टाकण्यास मदत करते. पाण्यामुळे आपल्याला दिवसभर ऊर्जा मिळते तसेच ताजेतवाने वाटते. मात्र पाण्याचे योग्य सेवन करणे गरजेचे आहे. अतिरिक्त पाणी पिणे किंवा चुकीच्या पद्धतीने पाणी पिणे आरोग्यास हानिकारक ठरते.

उभे राहून पाणी प्यायल्याने काय नुकसान होते?

  • उभे राहून पाणी प्यायल्याने शरीराला पोषक तत्व मिळत नाही. तसेच थकवा आणि ताण जाणवतो.

  • उभे राहून पाणी प्यायल्याने शरीराला ऑक्सिजन पोहोचण्यास अडथळे येतात. त्यामुळे हृदयाचे आरोग्य धोक्यात येते आणि फुफ्फुसांना त्रास होतो.

  • उभे राहून पाणी प्यायल्याने पचनक्रियेमध्ये अडथळे निर्माण होतात. तसेच ॲसिडीटीची समस्या उद्भवते.

  • उभे राहून पटापट पाणी प्यायल्याने किडनीवर दाब येऊन मूत्राशय संबंधित समस्या उद्भवतात.

  • उभे राहून पाणी प्यायल्याने सांधेदुखी वाढते. तसेच हाडे कमकुवत होतात. शरीराला व्हिटॅमिन डी ची कमतरता भासते.

  • उभे राहून पाणी प्यायल्याने मेंदूचे आरोग्य धोक्यात येते. मज्जासंस्थेपर्यंत पोषक तत्व पोहचत नाही. तसेच यकृताचे आरोग्य धोक्यात येते.

  • उभे राहून जास्त पाणी प्यायल्याने अवयवांवर दाब देऊन शरीराचे नुकसान होते. उदा. किडनीचे आरोग्य बिघडते. यामुळे सतत लघवीचा त्रास होतो त्यामुळे रात्री झोपताना झोपेचे नुकसान होते.

  • शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी पाणी पिणे गरजेचे आहे. पण जेवल्यावर उभे राहून पाणी प्यायल्याने पोटदुखीची समस्या उद्भवते.

  • उभे राहून घाईघाईत पाणी प्यायल्याने हृदयावर ताण येऊन हृदयविकाराचा धोका वाढतो.

पाणी पिण्याची योग्य पद्धत

  • तांब्याच्या भांड्यातून पाणी प्यायल्याने आरोग्य चांगले राहते.

  • चांगल्या आरोग्यासाठी बसून पाणी पिणे गरजेचे आहे.

  • बर्फाचे थंड पाणी पिणे टाळा. त्यामुळे वजन वाढू शकते.

  • कधीही कोमट पाणी प्यावे.

  • दिवसातून तीन ते चार लिटर पाणी पिणे चांगल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

  • तहान लागल्यावर पाणी प्यावे. अतिरिक्त पाणी पिऊ नये.

टीप : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cardamom Benefits: बहुगुणी वेलचीचे 'हे' फायदे तुम्हाला माहित आहे का?

Jharkhand Election Result: झारखंडमध्ये भाजपला धक्का, इंडिया आघाडीनं बहुमत गाठलं, कुणाला किती जागांवर आघाडी?

IND vs AUS 1st Test: लाईव्ह सामन्यात हर्षित राणा अन् मिचेल स्टार्क भिडले! नेमकं काय घडलं? -VIDEO

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: सांगलीत कोणत्या मतदारसंघात कोण आघाडीवर?

Vidhan Sabha Election Results : सुरुवातीच्या कलात भाजपने गाठलं शतक!

SCROLL FOR NEXT