Food Stored In Fridge : सावधान! दीर्घकाळ फ्रिजमध्ये पदार्थ साठवून ठेवताय? फूड पॉयझनिंगचा धोका

Food Stored In Fridge Tips : जास्त काळ फ्रिजमध्ये अन्न पदार्थ ठेवणे चुकीचे आहे. यामुळे शरीराच्या अनेक आजारांना आमंत्रण मिळते. फ्रिजमध्ये अन्न किती काळ सुरक्षित राहते जाणून घेऊयात.
Food Stored In Fridge Tips
Food Stored In FridgeSAAM TV
Published On

चांगल्या आरोग्यसाठी ताजे जेवण गरजेचे आहे. आजकालच्या धावपळीच्या जगात वारंवार जेवण बनवायला वेळ मिळत नाही. त्यामुळे बरेच लोक जास्तीच जेवण बनवून फ्रिजमध्ये स्टोर करून ठेवतात. पण हे अन्न फ्रिजमध्ये दीर्घकाळ ठेवून खाल्ल्यास आरोग्य धोक्यात येऊ शकते.

'या' गोष्टी लक्षात ठेवा

  • फ्रिजमध्ये दीर्घकाळ अन्न पदार्थ ठेवल्यास त्यातील पोषक घटक नष्ट होतात.

  • फ्रिजमध्ये पदार्थ ठेवल्यामुळे त्यांचा रंग आणि चवही बदलते.

  • फ्रिजमध्ये कधीही अन्न उघडे ठेवू नये. त्यामुळे अन्नावर लवकर बॅक्टेरिया तयार होतात.

  • फ्रिजमध्ये पदार्थ स्टोअर करताना नेहमी हवाबंद डब्याचा वापर करावा.

  • फ्रीजमध्ये ठेवलेल्या अन्नामध्ये चार दिवसात बॅक्टेरिया वाढू लागतात. त्यामुळे विषबाधा होण्याचा धोका वाढतो.

  • शिजवलेला एखादा पदार्थ पाच दिवसानंतर खाल्ल्यास फूड पॉयझनिंगचा धोका वाढू शकतो.

  • फ्रीजमधील बॅक्टेरिया असलेले जेवण जेवल्यास पोटासंबंधित समस्या उद्भवतात. उदा. पोटदुखी, ॲसिडीटी

Food Stored In Fridge Tips
Healthy Cooking Oil : कोणते खाद्य तेल आरोग्यास चांगले? जाणून घ्या

कोणते पदार्थ फ्रिजमध्ये कितीकाळ टिकतात?

भात

फ्रिजमध्ये भात जास्तीत जास्त २ दिवस ठेवाव. फ्रिजमधून भात काढल्यानंतर तो सामान्य तापमानावर आल्यानंतर गरम करून खावा.

चपाती

चपाती फ्रिजमध्ये १५ तासांच्यावर राहू शकत नाही. कालांतराने त्याला बुरशी लागते.

इतर पदार्थ

जेवणात वापरण्यात येणारे मसाले, आंबट आणि खारट पदार्थ तुम्ही फ्रिजमध्ये जास्त काळ ठेवू शकता.

डेअरी उत्पादने

डेअरी उत्पादने चांगली राहण्यासाठी रेफ्रिजरेटमध्ये ठेवावीत.

फळे

कोणतीही फळे फ्रिजमध्ये ८ तासांच्यावर ठेवू नये. त्यामुळे त्यांतील पोषक तत्वे निघून जातात. तसेच फ्रिजमध्ये फळे कापून ठेवू नये.

फ्रिजची स्वच्छता

ज्या ठिकाणी आपण अन्नपदार्थ ठेवतो. ती जागा स्वच्छ असणे खूप महत्वाचे आहे. नाहीतर आरोग्य धोक्यात येऊ शकते. तसेच अन्नपदार्थ लवकर खराब होऊ शकतात. त्यामुळे नियमित फ्रिजची स्वच्छता करावी. फ्रिजची स्वच्छता करण्यासाठी ट्रे आणि ड्रॉवर किचन क्लीन जेलचा वापर करून स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. आतील आणि बाहेरील भाग कपड्याने पुसून घ्या. फ्रिजमधील हट्टी डाग काढण्यासाठी तुम्ही लिंबू आणि व्हिनेगरचा वापर करू शकता.

टीप : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

Food Stored In Fridge Tips
Food Poisoning : पावसाळ्यात होणार्‍या फूड पॉयझनिंगवर घरगुती रामबाण उपाय, मिनिटात पोटाला मिळेल आराम

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com