Fridge Store : फ्रिजमध्ये चुकूनही 'हे' पदार्थ ठेवू नका; आरोग्यावर होतील गंभीर परिणाम

Do Not Store This Food in Fridge : फ्रिजमध्ये विविध फळे आणि भाज्या देखील ठेवल्या जातात. मात्र काही ठरावीक पदार्थ फ्रिजमध्ये ठेवल्यास ते खराब होतात.
Fridge Store
Fridge StoreSaam TV

फ्रिजमध्ये पदार्थ ठेवल्याने ते बराचकाळ चांगले राहतात. रात्री बनवलेलं अन्न उरल्यानंतर अनेक व्यक्ती ते फ्रिजमध्ये ठेवतात आणि दुसऱ्या दिवशी गरम करून खातात. फ्रिजमध्ये विविध फळे आणि भाज्या देखील ठेवल्या जातात. मात्र काही ठरावीक पदार्थ फ्रिजमध्ये ठेवल्यास ते खराब होतात.

Fridge Store
Fried Garlic Chutney : फ्राईड लसणाची चटणी बनवून जेवणाची चव दुप्पट करा!

टोमॅटो - टोमॅटो जास्त दिवस चांगला टिकावा यासाठी तो मोकळ्या हवेत ठेवणे गरजेचं आहे. फ्रिजमध्ये जास्त थंड हवेत टोमॅटोवर सुरकुत्या येतात आणि टोमॅटो खराब देखील होतो.

बटाटा - बटाट्यामध्ये स्टार्च असते. फ्रिजमध्ये ठेवल्यानंतर त्याचे साखरेत रुपांतर होते. असा बटाटा आपण खाल्ल्यास आपल्या आरोग्यावर त्याचा गंभीर परिणाम होतो.

कांदा - कांद्याला जास्त उष्णता गरजेची असचे. फ्रिजमध्ये कांदा ठेवल्यास त्याला पाणी सुटते आणि कांदा सडून खराब होतो.

केळी - तुम्ही कच्ची केळी फ्रिजमध्ये ठेवू शकता. मात्र फ्रिजमध्ये केळी ठेवल्यानंतर ती परत पिकत नाही.

मध - मध देखील कधीच फ्रिजमध्ये ठेवूनये. मधातील साखरेचा भाग आणि मध फ्रिजमध्ये ठेवल्याने वेगळे होते.

फ्रिजमध्ये ठेवलेले हे पदार्थ खाऊ नका

फ्रिजमध्ये चुकून ब्रेड आणि भात ठेवू नका. जर ठेवले असले तरी खाऊ नका. कारण फ्रिजमध्ये भातात आणि ब्रेडवर काही जिवाणू तयार होतात. ते आपण खाल्ल्यानंतर मळमळ, पोटदुखी, डोकेदुखी, पित्त अशा समस्यांचा सामना करावा लागतो.

टीप : ही फक्त सामान्य माहिती आहे. साम टीव्ही या माहितीचे समर्थन करत नाही.

Fridge Store
Fried Stones Viral Video: दगडांची चटपटीत डिश खाल्लीये का? पत्ता आणि किंमत्त व्हायरल VIDEO मध्ये पाहा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com