Hepatitis Disease Information: दूषित अन्न,पाण्यामुळे होऊ शकतो 'हिपॅटायटीस'सारखा गंभीर आजार; जाणून घ्या सविस्तर

Hipatitis Disease Meaning and Precaution in Marathi: आजकाल बदलती जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या सवयींमुळे अनेक आजार होतात. त्यामुळे वारंवार आपले हातपाय, पोट, डोके दुखत असते. अनेकदा तर आपण पोटदुखी, सूज येणे याकडे दुर्लक्ष करतो. परंतु दुर्लक्ष करुन चालणार नाही.
Hepatitis Disease Information: दूषित अन्न,पाण्यामुळे होऊ शकतो 'हिपॅटायटीस'सारखा गंभीर आजार; जाणून घ्या सविस्तर
Hepatitis B and C Disease Explained in MarathiGoogle

आजकाल बदलती जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या सवयींमुळे अनेक आजार होतात. त्यामुळे वारंवार आपले हातपाय, पोट, डोके दुखत असते. अनेकदा तर आपण पोटदुखी, सूज येणे याकडे दुर्लक्ष करतो. परंतु दुर्लक्ष करुन चालणार नाही. जर तुमच्या शरीरातील ऊतींना दुखापत झाली किंवा संसर्ग झाल्यास सूज आली तर तुम्हाला हिपॅटायटीस आजार असू शकतो. जाणून घेऊया हिपॅटायटीस आजाराबद्दल.

हिपॅटायटीस हा यकृताचा एक दाह असून तो हिपॅटायटीस विषाणूमुळे होतो. त्यामुळे शरीरातील ऊतींना दुखापत किंवा संसर्ग झाल्यास सूज येते. यामुळे शरीरातील इतर अवयवांचेही नुकसान होते. विविध अभ्यासांनुसार, हिपॅटायटीस ए, बी,सी,डी आणि ई यासह अनेक प्रकारचे विषाणू हिपॅटायटीसला कारणीभूत आहेत. शिवाय, एखाद्या संक्रमित व्यक्तीच्या विष्ठेद्वारे, दूषित अन्न किंवा पाण्याद्वारे हेपटायटस ए आणि हिपॅटायटीस ई संसर्ग होऊ शकतो. याबाबत डॉ अमीत मांडोत यांनी माहिती दिली आहे. डॉ अमीत मांडोत प्रमुख - डिपार्टमेंट ऑफ एडल्ट हिपॅटोलॉजी आणि लिव्हर ट्रान्सप्लांटेशन, ग्लेनईगल्स हॉस्पिटल, परेलमध्ये काम करतात.

Hepatitis Disease Information: दूषित अन्न,पाण्यामुळे होऊ शकतो 'हिपॅटायटीस'सारखा गंभीर आजार; जाणून घ्या सविस्तर
Silent Heart Attack: सायलेंट हार्ट अटॅक म्हणजे काय? जाणून घ्या तो कसा ओळखायचा

जेव्हा संक्रमणाचा प्रश्न येतो तेव्हा, हिपॅटायटीस ए आणि ई दूषित अन्न किंवा पाण्याद्वारे मिळू शकतात, तर हिपॅटायटीस बी आणि सी रक्त किंवा शारीरिक द्रवाद्वारे प्रसारित केले जातात. हिपॅटायटीस डी संसर्ग हा फक्त हिपॅटायटीस बी ची लागण झालेल्यांनाच होऊ शकतो. व्हायरल हिपॅटायटीसपासून बचाव करण्यासाठी पुरेशी खबरदारी घेणे ही काळाची गरज आहे.

हिपॅटायटीस असणा-या व्यक्तींना अनेकदा भेदभाव आणि गैरसमजूतीचा सामना करावा लागतो. यामुळे एकटेपणा आणि लज्जास्पद भावना निर्माण होते. व्हायरल हेपेटायटीस हा रक्त संक्रमणाद्वारे किंवा बाळाच्या जन्मादरम्यान देखील हा संसर्ग होऊ शकतो.

गंभीर स्वरूपाच्या हेपेटायटीस (हेपेटायटीस बी आणि सी) मध्ये दीर्घकालीन गुंतागुंत रोखण्यासाठी लवकरात लवकर निदान आणि उपचार होणे आवश्यक आहे. विषाणूजन्य हेपेटायटीसचे निदान जर विषाणूने यकृतावर परिणाम करण्याच्या आधी झाले तर हा आजार बरा करण्यासाठी प्रभावी औषधे उपलब्ध आहेत. काही केसेसमध्ये जर यकृताचे गंभीर नुकसान आधीच झालेले असेल तर यकृत प्रत्यारोपणाची आवश्यकता भासू शकते.

प्रतिबंध कसा कराल?

१. जागरूक रहा.

२. नेहमी शुद्ध पाणी प्या, शौचालय, घर, आजूबाजूचा सर्व परिसर कायम स्वच्छ ठेवा.

३. सर्वांचे लसीकरण झालेले असणे महत्त्वाचे आहे.

४. रक्त व रक्त उत्पादनांची सुरक्षा अबाधित राखली जावी.

५. असुरक्षित लैंगिक संबंध ठेवू नयेत.

Hepatitis Disease Information: दूषित अन्न,पाण्यामुळे होऊ शकतो 'हिपॅटायटीस'सारखा गंभीर आजार; जाणून घ्या सविस्तर
Night Shift: नाइट शिफ्टमध्ये काम करणे धोकादायक! लठ्ठपणा आणि मधुमेहाचा धोका वाढतोय

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com