What Is Silent Heart Attack And What Are The Major Warning Signs Of Silent Heart Attack?
What Is Silent Heart Attack And What Are The Major Warning Signs Of Silent Heart Attack?Yandex

Silent Heart Attack Symptoms: सायलेंट हार्ट अटॅक म्हणजे काय? जाणून घ्या तो कसा ओळखायचा

Silent Heart Attack Meaning and Symptoms in Marathi: दिवसेंदिवस तरुणांपासून वयोवृद्धांमधील हृदयविकाराच्या झटक्याचे वाढते प्रमाण एक चिंतेचा विषय ठरत आहे. प्रत्येक व्यक्तीची बदलेली जीवनशैली आणि खाण्याच्या विचित्र सवयीमुळे हृदयविकाराचे प्रमाण वाढत आहे.

दिवसेंदिवस तरुणांपासून वयोवृद्धांमधील हृदयविकाराच्या झटक्याचे वाढते प्रमाण एक चिंतेचा विषय ठरत आहे. प्रत्येक व्यक्तीची बदलेली जीवनशैली आणि खाण्याच्या विचित्र सवयीमुळे हृदयविकाराचे प्रमाण वाढत आहे. मात्र तुम्ही कधी कोणत्या व्यक्तीला सायलेंट हृ्दयविकाराच झटका आलाय? असे ऐकले आहे का?

What Is Silent Heart Attack And What Are The Major Warning Signs Of Silent Heart Attack?
Lifestyle To Prevent Cancer: कर्करोग टाळाण्यासाठी जीवनशैलीत करा 'हे' छोटे बदल

सायलेंट अटॅक हा आजार अत्यंत धोकादायक आहे. त्यात तुमचा जीवही जाऊ शकतो. या हृदयविकाराच्या आजाराचे लक्षण हे सामान्य हृदयविकाराच्या झटक्यासारखेच असते. जसे की, व्यक्तींमध्ये वाढणारा लठ्ठपणा तसेच उच्च कोलेस्ट्रॉल ,उच्च रक्तदाब (Blood-Pressure)आणि धूम्रपान ,मधुमेह इत्यादी लक्षणे सायलेंट हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी आपल्याला दिसून येतात. यामुळे प्रत्येक व्यक्तीने या सर्व समस्येकडे दुर्लक्ष करु नये.

चला तर जाणून घेऊयात सायलेंट हृदयविकारची लक्षणे.

श्वास घेण्याच त्रास

प्रत्येक व्यक्तीला जिंवत राहण्यासाठी श्वास घेणे अत्यंत महत्त्वाचे असते. मात्र त्यात कोणतीही समस्या जाणवल्यास एखाद्या वेळी व्यक्तीचा जीव धोक्यातही येतो. त्यात सायलेंट हृदयविकाराच्या झटक्यामध्ये कोणतेही जड काम अर्थात ज्या कामामुळे आपल्या श्वास कोंडला जाईल असे काम करत नसतानाही आपल्याला श्वास घेण्यास त्रास होतो.

विनाकारण थकवा जाणवणे

जेव्हा तुम्ही कोणत्याही प्रकारचे शारिरीक काम न करता काम करता तेव्हा तुम्हाला थकवा जाणवणे एक सामान्य आहे. मात्र कोणत्याही प्रकारचे शारिरीक काम न करता तुम्हाला थकवा जाणवत असेल तर ते सायलेंट हृदयविकारचे(Heart-Attack) लक्षण असू शकते.

चक्कर किंवा उलट्याचा त्रास

जर एखाद्या व्यक्तीला वारंवार चक्कर येण्याची समस्या आणि उलट्याचा त्रास जाणवत असेल तर त्या व्यक्तींसाठी हे गंभीर असू शकते.

घामाचे प्रमाण अधिक

एखादे काम करताना किंवा उन्हात बाहेर गेल्यावर घाम येणे हे अत्यंत साधारण गोष्ट आहे मात्र तुम्ही कोणतेही काम करत नसताना तुम्हाला घाम येत असल्यास ते सायलेंट हृदयविकारचे लक्षण असू शकते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

What Is Silent Heart Attack And What Are The Major Warning Signs Of Silent Heart Attack?
Healthy Lifestyle: रात्री उशीरा जेवल्याने आरोग्य सुधारतं की बिघडतं? जाणून घ्या

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com