ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
सध्याचे जीवन खूप जास्त धावपळीचे आहे. त्यामुळे अनेकदा योग्य आहार, पुरेशी झोप मिळत नाही.
खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे अनेक समस्या निर्माण होतात.
या सवयींमुळे रक्तदाबाच्या समस्या होतात. उच्च रक्तदाब ही एक गंभीर समस्या आहे.
उच्च रक्तदाबाचा परिणाम तुमच्या हृदयावर होऊ शकतो. तुम्हाला हृदयाचे विकार होऊ शकतात.
उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी पोषक आहार खूप महत्त्वाचा आहे. त्यासाठी तुम्ही आहारात पौष्टिक पदार्थांचा समावेश करायला हवा.
हिरव्या पालेभाज्या या शरीरासाठी खूप आवश्यक असतात. यात मॅग्नेशियम आणि पोटॅशिअमचे पुरेसे प्रमाण असते.
टॉमेटोमध्ये पोटॅशिअम, कॅरोटीनॉईड आणि लाईपीनचे प्रमाण आढळते. ज्यामुळे हृदयविकाराच्या समस्या होत नाही.
फळे ही निरोगी आरोग्यासाठी फायदेशीर असतात. फळांचे सेवन तुम्हाला अनेक आजारांपासून दूर ठेवते.