
PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसीय अमेरिका दौऱ्यावर आहेत. त्यांनी दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी गुरुवारी व्हाईट हाऊसमध्ये राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. यासोबतच त्यांनी अमेरिकन संसदेलाही संबोधित केले.
संपूर्ण कार्यक्रमात दोन्ही देशांमधील राजनैतिक संबंध वाढवण्यावर चर्चा झाली. यासोबतच इंडो-पॅसिफिक क्षेत्रात चीनचा वाढता धोका, सीमेपलीकडील दहशतवादात पाकिस्तानची भूमिका आणि रशिया-युक्रेन युद्धाबाबतही भारत आणि अमेरिका यांच्यात चर्चा झाली.
चीन आणि पाकिस्तानबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, देशातील सीमा भागातील स्थिरता ही आमची चिंता आहे. आम्हाला सीमा भागात शांतता हवी आहे. मुंबईतील 9/11 आणि 26/11 च्या हल्ल्यांनंतरही कट्टरतावाद आणि दहशतवाद हा संपूर्ण जगासाठी गंभीर धोका आहे.
दहशतवाद हा मानवतेचा शत्रू आहे. दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्यांविरुद्ध आणि दहशतवादाची निर्यात करणाऱ्यांविरुद्ध आपण एकत्र लढले पाहिजे. जग बदलत आहे, त्यामुळे जगाला नवीन व्यवस्थेची गरज आहे, मोदी म्हणाले. (Latest Marathi News)
व्हाईट हाऊसमध्ये मोदींनी पत्रकारांशीही संवाद साधला. एका महिला पत्रकाराने मोदींना तुमचे सरकार धार्मिक अल्पसंख्याकांशी भेदभाव करते? असा प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना मोदींनी म्हटलं की, भारतात लोकशाही आहे. भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांच्या डीएनएमध्ये लोकशाही आहे.
लोकशाही हा आपला आत्मा आहे. आपण लोकशाही जगतो आणि आपल्या पूर्वजांनी ती संविधानाच्या रूपात शब्दात मांडली आहे. लोकशाहीच्या मूलभूत मूल्यांवर बांधलेल्या संविधानाच्या आधारे आपले सरकार चालते.
लोकशाहीत कोणत्याही भेदभावाला स्थान नाही. माणुसकी नसेल, मानवाधिकार नसेल तर ती लोकशाहीच नाही. भारत 'सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास' या मूलभूत तत्त्वांसह पुढे वाटचाल करतो, असंही मोदी म्हणाले.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.