Sanjeev Jaiswal News : ईडीच्या कारवाईत IAS संजीव जयस्वाल यांच्याकडे घबाड सापडलं? कोट्यवधींची FD, मुंबईत जमीन...

ED Raid : ईडीने बीएमसीचे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या घरावरही धाड टाकली होती.
Sanjeev Jaiswal
Sanjeev JaiswalSaam Tv
Published On

सचिन गाड

Mumabi News: मुंबई महापालिकेतील कथित कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी ईडीच्या धाडसत्रानंतर अनेकांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. तत्कालीन महापौर किशोरी पेडणेकर यांच्यासह अनेक अधिकारी देखील यात अडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अंमलबजावणी संचालनालयाने म्हणजेच ईडीने बीएमसीचे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या घरावरही धाड टाकली होती. या धाडीत ईडीच्या हाती मोठं घबाड लागल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार संजीव जयस्वाल यांच्याकडे 24 मालमत्ता असल्याची माहिती समोर उघड झाली आहे. ज्याची एकूण किंमत 34 कोटी रुपयांच्या घरात आहे.  (Latest Marathi News)

Sanjeev Jaiswal
BMC Covid Scam: 'महापालिकेतील कोविड घोटाळ्याचे धागेदोरे आदित्य ठाकरेंपर्यंत पोचणार'

मुंबईत अर्धा एकरचा भूखंड

याशिवाय मढ आयलँडला त्यांचा अर्धा एकरचा भूखंड असल्याचीही माहिती आहे. ज्याची किंमतीही कोट्यावधींच्या घरात आहे.

तसेच 15 कोटी रुपयांची फिक्स डिपॉझिटही मिळाले आहेत. सगळी संपत्ती पत्नीला तिच्या कुटुंबियांकडून मिळाल्याचा दावा संजीव जयस्वाल यांनी केला आहे.

Sanjeev Jaiswal
BMC Covid Scam: ठाकरे गटाच्या अडचणी आणखी वाढणार? सूरज चव्हाण यांना ईडीचं समन्स

बॉडी बॅग्स घोटाळा

कोविड काळात मोठा मृतदेहांच्या बॉडी बॅग खरेदीत घोटाळा झाला आहे. सूत्रांनी सांगितलं आहे की, मृतदेहांच्या बॉडी बॅग खरेदीत घोटाळा झाला असून बोगस कर्मचारी दाखवून गैरव्यवहार झाला आहे. याकाळात ज्या बॉडी बॅग्स दोन हजारांना मिळत होत्या. त्याच बॅग चढ्या भावाने म्हणजेच 6800 रुपयांना विकत घेतल्या गेल्या.

घोटाळ्यात किशोरी पेडणेकर यांचं नाव आलं पुढे

या कथित घोटाळ्यात किशोरी पेडणेकर यांचं नाव देखील आता पुढे आलं आहे. यावर मात्र अद्याप त्यांची कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही. 

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com