Chetan Bodke
निरोगी जीवनशैलीसाठी नियमित योगा करणे आणि संतुलित आहार घेणे हे फायद्याचे ठरते. नियमित योगा केल्याने आपले शरीर सुदृढ राहते.
सध्या यकृताच्या आजारांचे प्रमाण वाढत चालले आहे. योगा केल्याने यकृताचे अनेक आजार दुर राहतात.
'हॅपेटायटिस' हा एक यकृताचा आजार आहे. संसर्गामुळे यकृताला सूज आली की, हॅपेटायटिसची समस्या उद्भवू शकते. हा आजार टाळण्यासाठी काही योगासने आहेत.
हॅपेटायटिस आजार टाळण्यासाठी शलभासन हे योगासन अतिशय फायदेशीर आहे. या योगासनाचा नियमित सराव केल्याने यकृताचे आरोग्य निरोगी राहण्यास आणि शांत झोप लागण्यास मदत होते.
भूजंगासन केल्याने आरोग्य मजबूत राहते, सोबतच पाठीचे दुखणे आणि पायांचे स्नायूंना आराम मिळेल. या योगासनाचा नियमित सराव केल्याने यकृतासंबंधित अनेक समस्या होतील.
या आसनामुळे आपली पचनक्रिया सुधारते. या योगासनामुळे पोटाच्या समस्याही सुधारते.
या आसनामुळे यकृताचे आरोग्य सुधारते. सोबतच यकृतासंबंधित आजारही दुर राहतात.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक माहितीसाठी जवळच्या डॉक्टरांसोबत संपर्क साधा.