Night Shift Work Dangerous For Health
Night Shift Work Dangerous For HealthGoogle

Night Shift: नाइट शिफ्टमध्ये काम करणे धोकादायक! लठ्ठपणा आणि मधुमेहाचा धोका वाढतोय

Night Shift Work Dangerous For Health: अनेक जण नाइट शिफ्ट करतात. नाइट शिफ्ट केल्याने झोप पूर्ण होत नाही. आपल्या संपूर्ण दिनक्रमाचे वेळापत्रक बिघडते.
Published on

अनेक जण नाइट शिफ्ट करतात. नाइट शिफ्ट केल्याने झोप पूर्ण होत नाही. आपल्या संपूर्ण दिनक्रमाचे वेळापत्रक बिघडते. नाइट शिफ्टचे लोक रात्री काम करतात आणि दिवसा झोपतात. त्यामुळे खाण्यापिण्याच्या वेळा चुकतात. पुरेशी झोप होत नाही. याचा वाईट परिणाम शरीरावार होतो. नाइट शिफ्ट करणाऱ्या लोकांमध्ये लठ्ठपणा आणि मधुमेहाचा धोका वाढू शकतो. वॉशिंग्टन स्टेट युनिव्हर्सिटी आणि पॅसिफिक नॉर्थवेस्ट नॅशनल लॅबोरेटरीच्या शास्त्रज्ञांनी यासंदर्भात अभ्यास केला आहे.

नाइट शिफ्टमध्ये काही दिवस काम केल्याने शरीरातील प्रथिनांची पातळी बिघडते. त्यामुळे रक्तातील साखरेवर परिणाम होतो. अभ्यासासाठी संशोधकांनी काही लोकांनी रात्रीच्या शिफ्टमध्ये तर काही लोकांना दिवसाच्या शिफ्टमध्ये काम करण्यास सांगितले. त्यांच्या रक्तवाहिन्या कसं काम करतात. याकडे लक्ष दिले. राभीच्या शिफ्टमध्ये काम केल्याने शरीरातील विशिष्ट प्रथिनांच्या पातळीवर परिणाम होते. ज्यामुळे शरीरातील साखरेची पातळी आणि पचनक्रिया व्यवस्थित काम करत नाही. त्यामुळेच लोकांना लठ्ठपणा आणि मधुमेहाच्या समस्या होतात.

या अभ्यासाचे वरिष्ठ लेखक प्रोफेसर हंस व्हॅन डोन्गेन यांनी माहिती दिली आहे. आपल्या मेंदूतील जैविक घड्याळ दिवस- रात्रीच्या चक्रांना नियंत्रित ठेवते. शरीराच्या इतर भागात जैविक घड्याळे असतात. रात्री काम केल्याने शरीराची काम करण्याची पद्धत बदलते. त्यामुळे तणावाची स्थिती निर्माण होते. यामुळे लठ्ठपणा आणि मधुमेहाचे आजार होऊ शकतात.

Night Shift Work Dangerous For Health
Morning Drinks: दिवसभर एनर्जेटिक राहण्यासाठी सकाळी 'या' पेयांचे करा सेवन, शरीर राहील निरोगी

याबाबत संशोधकांनी सांगितले की, रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करणाऱ्या लोकांनी जास्त काळजी घ्यायला हवी. खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये बदल करायला हवे. नाइट शिफ्टच्या लोकांना पुरेशी झोप घ्यायला हवी. जेणेकरुन शरीराला कोणतीही हानी पोहचणार नाही.

Night Shift Work Dangerous For Health
Green Tea Che Fayde: डाएटमध्ये ग्रीन टी घेताय? उन्हाळ्यात ग्रीन टी पिणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com