ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
नवीन घर खरेदी करणे हे प्रत्येक व्यक्तीसाठी आनंदाची गोष्ट असते.
मात्र नवीन घरी शिफ्ट होताना आपल्याला अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो.
अशावेळी नवीन घरी शिफ्ट होताना कोणती काळजी घेतली पाहिजे ते पाहूयात.
नवीन घरी शिफ्ट होताना जुन्या घरातून आवश्यक असणाऱ्याच वस्तु घेऊन जाणे.
नवीन घरी शिफ्ट झाल्यानंतर तुमच्या शेजारील कुटुंबाशी ओळख करुन घेणे,त्यामुळे गरजेच्या वेळी त्यांची मदत उपयोगी येते.
नवीन ठिकाणी राहण्यासाठी गेल्यानंतर तुमच्या सर्व महत्तवपूर्ण कागदपत्रांवरील पत्ता बदलून घेणे विसरु नका.
घराची सुरक्षितता प्रत्येकासाठी अत्यंत महत्त्वाची बाब असते,त्यामुळे कायम नवीन घरी शिफ्ट झाल्यानंतर घराचे कुलूप बदलून घेणे.
नवीन घरी शिफ्ट होण्याआधी संपूर्ण घरात पेस्ट कंट्रोल करुन घ्या.