Vishal Gangurde
बर्थ डे पार्टी म्हटलं की भरपूर खर्च येतो. अनेकांना ते परवडणारं नसतं. यासाठी काही सोप्या आणि सुंदर ट्रिक्स जाणून घेऊयात.
फुग्यांचा वापर करा
बर्थ डे पार्टीसाठी तुम्ही घराला रंगीत फुग्यांनी सजवू शकता. फुग्यांनी भिंती, दरवाजे, खिडक्या सजवता येऊ शकतात.
घर सजवण्यासाठी लाइटिंक करणे हा देखील चांगला पर्याय आहे. त्यासाठी स्वस्त एलईडी दिव्यांचा देखील वापर करू शकता.
तुम्ही घरातील भिंती, खिडक्यांवर लाइटिंग केल्यास घर सुंदर दिसेल. तसेच एक खास वातावरण तयार होईल.
थीमनुसार सजावट करा
तुम्ही पार्टीसाठी एखाद्या थीमनुसार सजावट करू शकता. लहान मुलांचा वाढदिवस असेल तर कार्टुन थीमची सजावट करू शकता.
बर्ड थे पार्टीसाठी एखाद्या टेबलवर सुंदर कापड ठेवून फुले आणि मेनबत्या ठेवून सजावट करू शकता.
तुम्ही टेबलावर चांगला एखादा कापड ठेवला. त्यानंतर फुगे, फुलदाणी आणि फुले याचा वापर करुनही सजावट करू शकता.