Morning Drinks: दिवसभर एनर्जेटिक राहण्यासाठी सकाळी 'या' पेयांचे करा सेवन, शरीर राहील निरोगी

अनेकांना सकाळी झोपेतून उठल्यानंतर थकवा जाणवतो. यासाठी तुम्हाला तुमच्या दिनचर्येत बदल केला पाहिजे.सकाळी या पेयांचे सेवन केल्यास शरीरातील ऊर्जा व रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होईल.
 Morning Drinks
Morning DrinksSaam Tv

सध्याची बदललेली जीवनशैली, वातावरणातील बदल, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे आरोग्यावर (Health)वाईट परिणाम होत आहेत. शरीरासाठी खाण्यापिण्यासोबत पुरेशी झोप आवश्यक आहे. नियमितपणे प्रत्येक व्यक्तीने ७ ते ८ तासांची झोप घेणे आवश्यक आहे. जर तुमची रात्रीची झोप पूर्ण झाली नसेल तर तुम्हाला दिवसभर थकवा जाणवतो.

 Morning Drinks
Green Tea Che Fayde: डाएटमध्ये ग्रीन टी घेताय? उन्हाळ्यात ग्रीन टी पिणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या

अनेकांना सकाळी झोपेतून उठल्यानंतर थकवा जाणवतो. यासाठी तुम्हाला तुमच्या दिनचर्येत बदल केला पाहिजे.सकाळी या पेयांचे सेवन केल्यास शरीरातील ऊर्जा व रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होईल.

नारळ पाणी

नारळपाणी हे शरीरासाठी आरोग्यदायी पेय आहे. सकाळी रिकाम्या पोटी नारळपाणी प्यायल्याने शरीराला उर्जा मिळते.

भाज्यांचा रस

सकाळी व्यायाम केल्यानंतर भाज्यांचा रस प्यावा. विशेषत: हिरव्या पालेभांज्याचा रस प्यायल्याने शरीराला पोषण मिळते. पालक ,पुदीना , कारले या भाज्यांचा रस प्यायल्याने शरीराला थकवा जाणवत नाही. मधुमेहाच्या रूग्णांनी सकाळी भाज्यांचा रस प्यायल्याने मधुमेहावर नियंत्रण राहते.

 Morning Drinks
Teeth Cleaning at Home: दातांचा पिवळेपणा दूर करण्यासाठी या घरगुती टिप्सचा उपयोग करा, दात मोत्यासारखे चमकतील

गोजी बेरी

गोजी बेरी या फळामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन्स, मिनरल्स, अॅन्टिऑक्सिडंट्स असतात. यामुळे सकाळी गोजी बेरी फळाचा रस प्यायल्याने शरीराचा ताण व थकवा दूर होतो.

लिंबू पाणी

सकाळी एक ग्लास लिंबू पाणी प्यायल्याने शरीराला थंडावा मिळतो. जर तुम्हाला सकाळी थकवा जाणवत असेल तर सकाळी लिंबू पाण्याचे सेवन करावे यामुळे दिवसभर मूड फ्रेश राहतो. लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी असल्याने शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.

 Morning Drinks
Breakfast Tips : नाश्त्याला चहा-चपाती खाल्ल्याने आरोग्यावर होणारे परिणाम तुम्हाला माहितीयेत का?

ग्रीन टी

ग्रीन टीचे आरोग्यासाठी अनेक गुणकारी फायदे आहेत.ग्रीन टीमध्ये सोडियम, पोटॅशियम, झिंक, कॉपर,प्रोटीन, लोह हे पोषणघटक असतात. सकाळी ग्रीन टी प्यायल्याने शरीरातून तणाव व थकवा दूर होतो

कोरफडीचा ज्यूस

सकाळच्या वेळेत कोरफडीचा ज्यूस प्यायल्यास शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडण्यास मदत होते. कोरफडीच्या गरामध्ये पाण्याचे प्रमाण भरपूर असते. यामुळे आपल्या शरीरातील पाण्याची पातळी कमतरता दूर होते..

डिस्क्लेमर:

सदर लेख सामान्य माहितीसाठी आहे. साम डिजीटल अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com