Green Tea Che Fayde: डाएटमध्ये ग्रीन टी घेताय? उन्हाळ्यात ग्रीन टी पिणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या

Benefits Of Drinking Green Tea: वजन कमी करण्यासाठी अनेक जण ग्रीन टीचे सेवन करतात. पण, उन्हाळ्यात ग्रीन टी पिणं योग्य की अयोग्य हे घ्या जाणून....
Green Tea Benefits: डाएटमध्ये ग्रीन टी घेताय? उन्हाळ्यात ग्रीन टी पिणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या
Green Tea Benefits in MarathiCanva

आजकालच्या धावपळीच्या जीवनामध्ये आपण जास्त प्रमाणात जंक फूडचे सेवन करतो आणि त्यामुळे वजन झपाट्याने वाढते. जंक फूडमध्ये जास्त प्रमाणात फॅट्स असतात जे शरीरात जाऊन एका ठिकाणी जमा होतात आणि त्यामुळे शरीरातील चरबी वाढते. पण सध्याची तरुण पिढी आरोग्याविषयी खूपच जागरुक असल्याचे चित्र पाहायला मिळते. बऱ्याच तरुणांना फीट राहणे आवडते. ज्यांचे वजन वाढत आहे त्यांनी आपल्या जीवनशैलीत बदल करुन योग्य व्यायाम आणि संतुलित आहार घेणं गरजेचे असते. वजन कमी करण्यासाठी अनेक जण ग्रीन टीचे सेवन करतात. मात्र उन्हाळ्यात ग्रीन टी प्यायल्यामुळे शरीराला धोका होऊ शकतो का असा प्रश्न अनेकांना पडतो. तर आज आपण उन्हाळ्यात ग्रीन टी पिणं योग्य आहे की नाही? हे जाणून घेणार आहोत...

Green Tea Benefits: डाएटमध्ये ग्रीन टी घेताय? उन्हाळ्यात ग्रीन टी पिणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या
Vitamin D : व्हिटॅमिन 'D' ची कमतरता असल्यास तुम्हालाही होऊ शकतो कर्करोग

वजन कमी करण्यासाठी व्यायमासोबत उत्तम आहाराचे सेवन करणे गरजेचे असेत. त्यामुळे व्यायामासोबत संतुलित आहार घेणं शरीरासाठी फायदेशीर मानलं जातं. वजन कमी करण्यासाठी अनेक जण ग्रीन टीचे सेवन करतात. ग्रीन टीमुळे शरीरातील चयापचय वाढते आणि वजन कमी करण्यास मदत होते. ग्रीन टीमध्ये भरपूर प्रमाणात कॅफिन आणि कॅटेचिन नावाचे घटक आढळतात. ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. त्यासोबतच ग्रीन टीमध्ये अँटिऑक्सिडेंट गुणधर्म असल्यामुळे आपला रक्तदाब नियंत्रित राहातो.

तुम्ही जर ग्रीन टीचे सेवन करत असाल तर तुम्हाला पचनाशी संबंधीत समस्या निर्माण होत नाहीत. ग्रीन टीमध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात ज्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. तुमचं वाढलेलं वजन तुम्हाला कमी करायचे असेल तर उन्हाळा हा ऋतू तुमच्यासाठी उत्तम आहे. उन्हाळ्याच तुम्ही योग्य व्यायम आणि पोषक आहाराचे सेवन करुन वजन कमी होऊ शकता. ग्रीन टी प्यायल्यामुळे तुमचे वजन कमी होतचं. त्यासोबतचं शरीराला आवश्यक उर्जा दोखील मिळते.

सकाळी उठल्यावर ग्रीन टीचे सेवन केल्यामुळे दिवसभर तुम्हाला ताजेतवाणे वटते. उन्हाळ्यात अनेकदा शरीरात पाण्याची कमतरता भासते. अशावेळी शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी आणि शरीरातील एनर्जी लेव्हल वाढवण्यासाठी तुम्ही ग्रीन टीचे सेवन करू शकता. अनेक जण सर्जरी किंवा सप्लिमेंटंस घेऊन वजन कमी करतात. मात्र यामुळे शरीराला अनेक समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. माहितीनुसार, मार्केटमध्ये मिळणाऱ्या सप्लिमेंटंसमुळे किडनीसंबंधीत समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी योग्य आहार आणि व्यायम करणं गरजेचे आहे.

Green Tea Benefits: डाएटमध्ये ग्रीन टी घेताय? उन्हाळ्यात ग्रीन टी पिणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या
Green Tea प्यायल्याने आरोग्याला काय फायदे होतात? | Marathi News #greentea

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com