How To Increase Energy Level : शरीर सतत थकल्यासारखे वाटते? एनर्जी लेवल वाढवण्यासाठी या ५ गोष्टी लक्षात ठेवा

5 Simple Way To Increase Energy Level : जर तुम्हालाही सतत थकल्यासारखे किंवा अशक्तपणा वाटत असेल तर काही गोष्टींची काळजी घेतल्यास तुम्हाला उत्साही वाटेल. शरीरातील एनर्जी वाढवण्यासाठी तुम्ही या ५ गोष्टी लक्षात ठेवा.
How To Increase Energy Level
How To Increase Energy Level Saam Tv
Published On

Do You Feel Tired And Weak :

चुकीची जीवनशैली, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, स्क्रीन टाइम आणि झोपेची कमतरता यामुळे आपल्याला थकवा जाणवतो. पुरेशी विश्रांती घेतल्यानंतरही जर सकाळी उठल्यानंतर थकवा जाणवत असेल तर याकडे दुर्लक्ष करु नका.

काही लोक सतत थकलेले किंवा अनेकदा अशक्त वाटतात. कधी कधी याचे कारण आजारपण (Disease) देखील असू शकते. जर तुम्हालाही सतत थकल्यासारखे किंवा अशक्तपणा वाटत असेल तर काही गोष्टींची काळजी (Care) घेतल्यास तुम्हाला उत्साही वाटेल. शरीरातील एनर्जी वाढवण्यासाठी तुम्ही या ५ गोष्टी लक्षात ठेवा.

1. हे पदार्थ खाणे टाळा

काही खाद्यपदार्थांमुळे पचन आणि ऊर्जा या दोन्हींमध्ये समस्या निर्माण होतात. अतिप्रमाणात साखरेचे सेवन केल्यास शरीरातील ऊर्जेची पातळी कमी होते. त्यामुळे अन्नपदार्थ पचायला बराच वेळ लागतो. त्यासाठी असे अन्नपदार्थ (Food) खाणे टाळा.

How To Increase Energy Level
Stress And Diabetes: अधिकच्या तणावामुळे जडू शकतो मधुमेहाचा विकार, कशी कराल यावर मात?

2. अल्कोहोल

जर तुम्ही सतत अल्कोहोलचे सेवन करक असाल तर झोपेच्या गुणवत्तेवर आणि ऊर्जेच्या पातळीवर परिणाम होतो. त्यामुळे तुमची चिडचिड होते. तसेच डिहायड्रेशनची समस्या निर्माण होते.

3. तणाव

अधिकचा तणाव घेतल्याने आपल्याला थकवा येतो. यासाठी मानसिक आणि शारीरिक आरोग्याची काळजी घ्यायला हवी. तणाव कमी करण्यासाठी ध्यान करा, कोमट पाण्याने आंघोळ करा, व्यायाम करा.

How To Increase Energy Level
Night Shift Affect Health: नाइट शिफ्ट करताय? आरोग्यावर होतोय विपरीत परिणाम, जाणून घ्या तज्ज्ञांकडून

4. व्यायाम करा

निरोगी राहाण्यासाठी व्यायामाचे अनेक फायदे आहेत. नियमितपणे शारीरिक व्यायाम केल्याने ऊर्जा पातळी देखील वाढू शकते. त्यासाठी किमान ३० मिनिटे व्यायाम करायला हवा.

5. जास्त पाणी प्या

डिहायड्रेशनची कमतरता जाणवू लागल्यास आपल्याला थकवा जाणवू लागतो. अनेकदा या समस्यांकडे दुर्लक्ष केले जाते. ऊर्जात्मक राहाण्यासाठी तुम्ही पुरेशा प्रमाणात पाणी प्यायला हवे. यासाठी दिवसातून किमान आठ ग्लास पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com