Night Shift Affect Health: नाइट शिफ्ट करताय? आरोग्यावर होतोय विपरीत परिणाम, जाणून घ्या तज्ज्ञांकडून

Work In Night Shift : ग्लोबलायझेशनमुळे अनेक परेदशी कंपन्या भारतात आल्या. परिणामी नोकरीची वेळ बदली, कामाचे स्वरुप बदलले, खाण्यापिण्याच्या सवयी बदल्या तसेच झोपेची वेळ देखील बदली आहे. त्यामुळे आपल्या आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागते.
Night Shift Affect Health
Night Shift Affect HealthSaam Tv
Published On

Night Shift Disadvantage :

वाढत जाणाऱ्या तंत्रज्ञानानुसार कामाच्या पद्धती देखील बदल्या आहेत. चांगले आयुष्य जगण्यासाठी आपल्याला काम करावे लागते. त्यासाठी आपण चांगल्या प्रकारची नोकरी शोधत असतो.

साधारणपणे सकाळी ९ ते ६ ही ऑफिसची वेळ मानली जाते. परंतु, ग्लोबलायझेशनमुळे अनेक परेदशी कंपन्या भारतात आल्या. परिणामी नोकरीची (Job) वेळ बदली, कामाचे स्वरुप बदलले, खाण्यापिण्याच्या सवयी बदल्या तसेच झोपेची वेळ देखील बदली आहे. त्यामुळे आपल्या आरोग्याच्या (Health) समस्यांना सामोरे जावे लागते.

रात्रीच्या वेळी उशीरा पर्यंत काम केल्याने पोटाच्या समस्येपासून अनेक प्रकारच्या मानसिक समस्यांना सामोरे जावे लागते आहे. असे का होते आहे जाणून घेऊया तज्ज्ञांकडून

1. तज्ज्ञ काय म्हणाले?

तज्ज्ञांच्या मते शरीरात जैविक घटक आहेत, त्यानुसार शरीर काम करते. हे शरीराला प्रत्येक काम वेळेनुसार करण्याचे संकेत देते, ज्याप्रमाणे दिवस कामासाठी असतो. त्याप्रमाणे रात्रीची वेळ ही विश्रांतीसाठी असते.

Night Shift Affect Health
Breast Cancer : महिलांनो, स्तनाच्या कर्करोगाचा सामना करताना मानसिक आरोग्यावर होतोय परिणाम; वेळीच घ्या काळजी

जेव्हा तुम्ही रात्री झोपता तेव्हा शरीरातील प्रत्येक अवयव स्वत:च्या दुरुस्तीचे काम करतो. खराब झालेल्या पेशी पुन्हा निर्माण होतात ज्यामुळे शरीर दुसऱ्या दिवसासाठी पुन्हा तयार होते. ही प्रक्रिया अशीच चालू राहाते. यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढून ऊर्जा तयार होते. रात्रंदिवस सतत काम केल्यावर तुमचे शरीर थकते आणि तुम्ही आजारी (Disease) पडता. यामुळे विश्रांती घेणे देखील गरजेचे आहे.

रात्रपाळीमध्ये काम करणाऱ्या अनेकांना संसर्गाचा धोका अधिक वाढतो. त्यामुळे ते अधिक आजारी पडतात तसेच पचन आणि इतर अनेक समस्यांना बळी पडतात. मानसिक आजार देखील बळावतो.

Night Shift Affect Health
Menopause Risk Stroke : धक्कादायक! १० पैकी ४ महिलांना रजोनिवृत्तीमुळे स्ट्रोकचा धोका, संशोधनातून खुलासा

2. हार्मोन्सवर नकारात्मक परिणाम

रात्रपाळीमुळे शरीरातील अनेक संप्रेरकांवरही परिणाम होतो, ज्यामुळे आपल्या झोपेसाठी जबाबदार असणारे मेलाटोनिन हे अनेकदा रात्री सोडले जाते. तणावाशी निगडीत कॉर्टिसॉल नावाचे संप्ररेक अनेकदा सकाळी बाहेर पडतात. जेव्हा तुम्ही नाईट शिफ्ट करता तेव्हा हार्मोन्स सोडण्याची वेळ बिघडते. त्यामुळे निद्रानाश आणि मानसि समस्या अधिक वाढतात. यामुळे लठ्ठपणा, उच्च रक्तदाब आणि तणावाच्या समस्यांचा धोका असतो.

3. रात्रपाळी करताना काळजी काय घ्याल?

  • रात्रपाळी करताना विश्रांतीसाठी काही तांसाचा ब्रेक घ्या.

  • रात्री जागे राहाण्यासाठी जास्त प्रमाणात कॅफिन, सिगारेट इत्यादी गोष्टींचा अवलंब करु नका.

  • दिवसा पुरेशी झोप घ्या.

  • दररोज व्यायाम करा आणि स्वत:ला सक्रिय ठेवा.

  • निरोगी राहाण्यासाठी दिवसा काम करा, ज्यामुळे तुमच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com