शरीराला खनिजे आवश्यक असतात का ?

शरीराच्या वाढीसाठी व हाडे मजबूत करण्यासाठी खनिजे उपयुक्त ठरतात.
Importance of minerals in human body, foods with minerals
Importance of minerals in human body, foods with mineralsब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
Published On

मुंबई : शरीराच्या वाढीसाठी व हाडे मजबूत करण्यासाठी खनिजे उपयुक्त ठरतात. त्याचा आहारात समावेश केल्याने शारीरिकआरोग्याचा समतोल राखणे शक्य आहे. (Importance of minerals in human body)

हे देखील पहा -

कॅल्शिअम, फॉस्फरस, सोडियम, आयर्न, पोटॅशियम इत्यादी ही खनिजे आपल्या शरीरासाठी आवश्यक आहेत. शरीरात खनिजांची कमतरता आढळल्यास दातांचे दुखणे, हाडांची ठिसूळता वाढण्याचा संभव असतो. तसेच त्याच्या कमतरतेमुळे हाडे दुखतात व कमतरता येते कोणत्या खनिजातून आपल्याला काय मिळते ते पाहूया

१. सोडियम शरीराला आवश्यक पाचक रसायनाची निर्मिती करतात. सोडियममुळे शरीरात तयार होणारा गॅस नष्ट होतो. मीठ, मिरची, पालक, सफरचंद, कारलं यातून सोडियम मिळते. सोडियमच्या कमतरतेमुळे रक्तदाबाशी निगडित समस्या, निद्रानाश, अंगदुखी, अपचन, मूळव्याधीसारखे आजार, मोतीबिंदू या गोष्टी होतात.

Importance of minerals in human body, foods with minerals
प्रसुतीनंतर केस गळतीची समस्या कमी करण्यासाठी या पदार्थाचा आहारात समावेश करा

२. आयोडिन शरीरात उत्पन्न होणाऱ्या विषारी पदार्थापासून मेंदूला बचावण्याचे काम करतो. शिंगाडा, काकडी आणि लसूण यातून आयोडीन मिळते. आयोडीनच्या कमतरतेमुळे थायरॉइडची समस्या, केस गळणे (Hair), डिप्रेशन किंवा बैचेनी येणे या गोष्टी होतात.

३. पोटॅशियम शरीरात तंतू आणि यकृत यांना सुरळीत ठेवण्याचे कार्य करते. सर्व प्रकारची धान्य, डाळ, संत्री, अननस, केळी यातून पोटॅशियम मिळते. पोटॅशियमच्या कमतरतेमुळे अॅसिडिटी, त्वचेवर सुरकुत्या किंवा मुरुमं येणं, त्वचा (Skin) रोग, केस पिकणे या गोष्टी होतात.

४. फॉस्फरस मेंदूला ताजेतवाने ठेवण्याचं काम करतो. दूध, पनीर, डाळी, कांदा, टोमॅटो, गाजर, जांभूळ, पेरू, काजू, बदाम, बाजरी आणि चणे यातून फॉस्फरस मिळते. फॉस्फरसच्या कमतरतेमुळे ऑस्टिओपोरोसिस, गतिमंद होणे, मानसिक थकवा, दंत रोग या आरोग्य समस्या उद्भवतात‌.

५. कॅल्शिअम शरीरातील सर्वात मुख्य खनिज असून ते हाडांची मजबुतीसाठी आवश्यक आहे. शेंगदाणे, तीळ, दूध, खोबरं, मुळा यातून कॅल्शियम मिळते. कॅल्शियमच्या कमतरतेमुळे हृदयरोग, ऑस्टियोपोरोसिस, दंतरोग, केस गळणे यांसारख्या आरोग्य समस्या उद्भवतात.

६. शरीराच्या वाढीसाठी लोह अतिशय आवश्यक आहे. खजूर, अंजीर, मनुका, सफरचंद, डाळिंब, पालक, सीताफळ, पपई आणि मेथी यातून लोह मिळते. लोहाच्या कमतरतेमुळे शरीरात रक्ताची कमतरता भासते. तसेच अशक्तपणा, कावीळ किंवा पोटात मुरडा येतो

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com