Vitamin D : व्हिटॅमिन 'D' ची कमतरता असल्यास तुम्हालाही होऊ शकतो कर्करोग

Deficiency Of Vitamin D : हाडे आणि दातांसाठी ड जीवनसत्व फार महत्वाचं असतं. त्यासह मानसिक स्वास्थ चांगलं राहण्यासाठी देखील ड जीवनसत्व महत्वाचं आहे.
Deficiency Of Vitamin D
Vitamin DSaam TV
Published On

डॉ राजेश बेंद्रे, नॅशनल टेक्निकल हेड आणि हेड पॅथॉलॉजिस्ट, अपोलो डायग्नोस्टिक, मुंबई

ड जीवनसत्वाची (व्हिटॅमिन डी) कमतरता ही अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत असू शकते. ड जीवनसत्वाची शरीरात कमी असणे ही फार सामान्य बाब आहे. मात्र याकडे दुर्लक्ष्य केल्यास विविध आजार जडण्याची शक्यता असते. हाडे आणि दातांसाठी ड जीवनसत्व फार महत्वाचं असतं. त्यासह मानसिक स्वास्थ चांगलं राहण्यासाठी देखील ड जीवनसत्व महत्वाचं आहे.

Deficiency Of Vitamin D
Skin Care Tips: 'या' लोकांनी Vitamin C सीरमचा वापर करु नये

ड जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे कर्करोग होण्याची शक्यता असते. यामध्ये ऑस्टिओपोरोसिस, नैराश्य, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी काही विशिष्ट प्रकारचा कर्करोग होऊ शकतो. ड जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे हाडे कमजोर होतात. लहान मुलांमध्ये डी जीवनसत्वाची कमतरता असल्यास हाडे फॅक्चर होतात आणि मुडदूस देखील होऊ शकतो.

व्हिटॅमिन डीच्या कमतरतेची लक्षणे

लठ्ठपणा, किडनीचे आजार देखील व्हिटॅमिन डीची कमतरता होऊ शकतात. व्हिटॅमिन डीच्या कमतरतेची लक्षणांमध्ये थकवा जाणवणे, नैराश्य, स्नायूंमधील वेदना, हाडांसंबंधी वेदना आणि सांधेदुखी अशा समस्या आढळतात. त्यामुळे दररोज सकाळच्यावेळी सूर्यप्रकाशात जाणे आणि व्हिटॅमिन डी सप्लिमेंट्सचे सेवन करणे असे उपाय केल्याने फायदा होईल.

तुमच्यात 'व्हिटॅमिन डी'ची कमतरता आहे हे कसं ओळखाल?

आपल्या शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी काही टीप्स फॉलो कराव्या लागताील. 25 हायड्रॉक्सीविटॅमिन डी रक्त चाचणी तुमच्या रक्तातील व्हिटॅमिन डीची पातळी मोजण्यास मदत करते.

तुमची हाडे कमकुवत आहेत की नाही हे हाडांची घनता तपासल्यानंतर लगेचच लक्षात येते. त्यासह रक्त तपासल्यानंतर देखील तुमच्या शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता आहे की नाही हे समजते.

व्हिटॅमिन डीची कमतरता टाळण्यासाठी उपाय

व्हिटॅमिन डीची कमतरता टाळण्यासाठी उंचीनुसार योग्य वजन असणे गरजेचे आहे. त्यासाठी दररोज व्यायाम करा आणि पुरेसा सूर्यप्रकाश मिळवा. ज्यांना ऑस्टियोपोरोसिस आहे आणि ज्यांना व्हिटॅमिन डीची कमतरता आहे त्यांनी डॉक्टरांनी दिलेल्या सूचनांचे पालन करा.

Deficiency Of Vitamin D
Vitamin-D For Weight Loss : वाढलेल्या लठ्ठपणामुळे वैतागले आहात ? आहारात जीवनसत्त्व 'ड' च्या 'या' पदार्थांचा समावेश करा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com