Healthy Cooking Oil : कोणते खाद्य तेल आरोग्यास चांगले? जाणून घ्या

Cooking Oil Tips : चांगल्या आरोग्यासाठी जेवण बनवताना योग्य खाद्य तेल वापरणे गरजेचे आहे. जेवणासाठी कोणते खाद्य तेल चांगले हे जाणून घ्या.
Cooking Oil Tips
Healthy Cooking OilSAAM TV
Published On

आजकालच्या धावपळीच्या जीवनात अनेकांना कोलेस्ट्रॉलची समस्या असते. वाढते कोलेस्ट्रॉल अनेक आजारांना आमंत्रण देते. त्यामुळे जेवण बनवताना योग्य खाद्य तेल वापरणे गरजेचे आहे. शरीरातील जास्त फॅटमुळे हृदयविकार आणि रक्तदाब यांच्यासारखे आजार उद्भवतात.

बाजारात अनेक तेल उपलब्ध असतात. जसे की, ऑलिव्ह ऑईल, खोबरेल तेल, सूर्यफूल तेल, शेंगदाणा तेल, व्हेजिटेबल तेल. यासर्व तेलांपैकी आरोग्यास चांगले तेल कोणते आपण आज जाणून घेऊयात. या सर्व तेलांमध्ये विविध गुणधर्म आहेत. जे आरोग्यावर चांगले-वाईट परिणाम करतात.

ऑलिव्ह ऑईल

बहुतेक जण ऑलिव्ह ऑईल जेवण्यासाठी वापरतात. जे आरोग्यासाठी उत्तम आहे. हे तेल पूर्णपणे शुद्ध असते. या तेलावर कोणतीही प्रक्रिया केली जात नाही. त्यामुळे त्याची गुणवत्ता खूप चांगली असते. ऑलिव्ह ऑईलमध्ये पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटी अ‍ॅसिडची मात्रा चांगली असते. यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहते. पोटातील बॅक्टेरिया दूर करण्यासाठी हे तेल चांगले असते. मधुमेहाच्या लोकांनी या तेलाचे सेवन करावे. ऑलिव्ह ऑईलमुळे अनेक आजारांपासून आपले संरक्षण होते.

खोबरेल तेल

चांगल्या आरोग्यासाठी खोबरेल तेलाचे सेवन कमी करावे. यामुळे आरोग्याच्या समस्या वाढू शकतात. या तेलात सॅच्युरेटेड फॅटची मात्रा जास्त असते. जे आरोग्यासाठी घातक आहे. यामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉल पातळी वाढते.

सूर्यफूल तेल

सूर्यफूल तेल हे व्हिटॅमिन ई ने समृद्ध असते. मात्र या तेलाला चव नसते. शरीराला आवश्यक असलेले ओमेगा-६ फॅटी ॲसिड या तेलात असते. पण हे तेल जास्त प्रमाणात वापरल्यास छातीत जळजळ होऊ शकते.

Cooking Oil Tips
Control Blood Pressure : सावधान! ब्लड प्रेशर वाढतोय? नियंत्रणात ठेवण्याचे सोपे उपाय वाचा

शेंगदाणा तेल

शेंगदाणा तेल आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. या तेलाला चवीसोबत चांगला सुगंधही असतो. या तेलामध्ये मोनोअनसॅच्युरेटेड फॅटचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे आरोग्य चांगले राहते.

व्हेजिटेबल तेल

व्हेजिटेबल तेल हे वनस्पतीद्वारे बनवले जाते. या तेलाच्या सेवनामुळे कोलेस्ट्रॉल संतुलित राहते. हे तेल बनवण्यासाठी यावर प्रक्रिया केली जाते. त्यामुळे याचे सेवन मर्यादित करावे. ही प्रक्रिया केल्यामुळे तेलाची चव आणि पोषण कमी होते.

'या' गोष्टी लक्षात ठेवा

  • तेल कधीही कमी प्रमाणात खावे.

  • तेल जास्त गरम करू नये. त्यामुळे तेलातील पोषक घटक नष्ट होतात.

  • एकच तेल सारखं गरम करून वापरू नये. त्यामुळे आरोग्य बिघडते.

टीप : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

Cooking Oil Tips
Food Poisoning : पावसाळ्यात होणार्‍या फूड पॉयझनिंगवर घरगुती रामबाण उपाय, मिनिटात पोटाला मिळेल आराम

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com