ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मासिक पाळीमध्ये प्रचंड वेदना होतात. काही वेळा पाळीदरम्यान होणाऱ्या वेदनांमुळे स्त्रियांना आपल्या कामावर लक्ष केंद्रित करता येत नाही.
तर काही महिलांना बेडवरच राहावे लागते. मात्र काही घरगुती पदार्थांच्या मदतीने तुम्हाला आराम मिळू शकतो.
आल्याचे सेवन केल्यामुळे मासिक पाळीमध्ये खूप आराम देऊ शकते. आल्यामुळे शरीरातील प्रोस्टाग्लॅन्डिन्सची पातळी कमी होते.
आल्याला सुपरफूड म्हणतात कारण त्यामध्ये आरोग्यासाठी आवश्यक पोटॅशियम, मॅंगनीजआणि मॅग्नेशियम सार्खे पौष्टिक घटक अस्तात.
आलं आणि तुळशीचा हा हर्बल चहा तुम्हाला मासिक पाळीच्या वेदनेतून आराम देईल.
आले आणि ओवा काही वेळ एकत्र उकळा आणि त्याचे सेवन केल्यास पाळीच्या वेदनेतून आराम देईल.
आल्याचे कोमट पाण्यात आणि मध एकत्र करून प्यायल्यास पाळीच्या वेदनांपासून आराम मिळतो.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा़