Benefits of Raw Garlic: रोज सकाळी लसूणच्या 2 पाकळ्या खा; फायदे पाहून व्हाल चकित

Health Tips : लसूणच्या फक्त दोन पाकळ्या जरी खाल्ल्या तरी त्याने आपल्याला अनेक पोषक तत्व मिळतात. तसेच व्यक्तीला निरोगी राहण्यास मदत होते.
Health Tips
Benefits of Raw GarlicSaam Tv

लसूण प्रत्येक व्यक्तीच्या घरात सहज उपलब्ध होतो. जेवणातील विविध पदार्थांची चव वाढवणारा लसूण खाण्याचे आपल्या आरोग्यासाठी अनेक गुणकारी फायदे आहेत. लसूणच्या फक्त दोन पाकळ्या जरी खाल्ल्या तरी त्याने आपल्याला अनेक पोषक तत्व मिळतात. तसेच व्यक्तीला निरोगी राहण्यास मदत होते. चला तर मग आज जाणून घेऊ लसूण खाण्याचे फायदे काय आहेत.

Health Tips
Diabetes Health: मधुमेहींनो, आहारात हे ५ पदार्थ खा, साखर नियंत्रणात राहिल

लसूणमध्ये जास्त प्रमाणात थायमिन, नियासिन, फॉलेट, व्हिटॅमिन सी आणि जिंक आहे. तसेच यामध्ये पोटॅशियम, फॉस्फरस आणि मॅग्नेशियम सुद्धा असते. त्याने आपण निरोगी राहतो. तसेच आपली रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढली जाते.

लसूणमध्ये मोठ्याप्रमाणात अँटी -इंफ्लेमेटरी सारखे तत्व असतात. त्याने आपल्या शरीरावर जर कोणत्याही प्रकारे सूज आली असेल तर ती कमी होते. थायरॉईड आणि डायबेटिज या समस्येने अनेक व्यक्ती पीडित आहेत. त्यांच्यासाठी सकाळी रिकाम्या पोटी लसूण खाणे वरदान आहे.

लसूण खाल्ल्याने आपली रोग प्रतिकारक शक्ती सुद्धा वाढते. त्यामुळे जेवणात विविध पदार्थांनी लसूण नक्की टाकावा. तसेच आपली इम्युनिटी सिस्टम स्ट्रॉंग होते. काही व्यक्ती भाजी किंवा अन्य काही पदार्थांमध्ये लसूण असल्यास तो बाजूला काढतात आणि मग ती भाजी खातात. मात्र भाजीमधील लसूण अशा पद्धतीने वेगळा काढणे चुकीचे आहे. त्याने तुम्हाला मिळणारे अनेक पोषक तत्व वाया जातील.

पावसाळ्यात त्वचेच्या विविध समस्या उद्भवतात. काहींना पावसाच्या पाण्याने पायांना चिखल्या होतात. तर काहींना त्वचेवर लाल चट्टे उमटतात. त्यामुळे अशावेळी लसूण आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतो. लसूण खाल्ल्याने त्वचेच्या या समस्या दूर होतात.

लसूणचे सेवन केल्याने आपल्याला रक्त सुद्धा होते. तसेच शरीरात जमा झालेलं बॅड कोलेस्ट्रॉल कमी होतं. ज्या व्यक्तींच्या शरीरात बॅड कोलेस्ट्रॉल जास्त वाढलं आहे त्यांनी रोज सकाळी उठल्यावर नाश्ता करण्याआधी लसूणच्या दोन पाकळ्या चावून खाल्ल्या पाहिजेत.

Health Tips
Monsoon Health : पावसाळ्यात 'हे' पदार्थ लहान मुलांना खाऊ देऊ नका; अन्यथा...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com