ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
जर आपल्या घरात लहान मुलं असतील तर आपल्याला त्यांच्या आहाराची जास्त काळजी घ्यावी लागते.
मात्र अनेकदा मुलं हट्ट करुन फास्ट फुड खातात. परंतू हे पदार्थ मुलांच्या आरोग्यासाठी चांगले नसतात.
चला तर जाणून घेऊयात मुलांना कोणते पदार्थ खाण्यास देऊ नये.
कायम लक्षात ठेवा की मुलांना कधीही शिळे अन्न खाण्यास देऊ नये.
मुलांना जास्त साखर असलेले कोणतेही पदार्थ खाण्यास देऊ नये. अशाने मुलांच्या आरोग्यावर परिणाम होतो.
बाहेर मिळणारे फास्ट फूड मुलांना जास्त खाण्यास देऊ नये. शक्यतो न देण्याचा प्रयत्न करावा.
बाजारात अनेक प्रक्रिया केलेले पदार्थ मिळतात, असे पदार्थ मुलांना खाण्यास देऊ नये.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.