Bhoplyache Soup Recipe : गरमागरम भोपळ्याचे सूप कधी प्यायलात का? एका घोटात येईल तरतरी

Shreya Maskar

सूप प्या

बदलत्या वातावरणामुळे शरीराला फायदेशीर पदार्थ खाणे गरजेचे आहे. शरीराला ऊर्जा देण्यासाठी भोपळ्याचे सूप प्या. झटपट होणारी रेसिपी वाचा.

Bhoplyache Soup | yandex

भोपळ्याचे सूप

भोपळ्याचे सूप बनवण्यासाठी भोपळा, लसूण, आलं, कांदा, तूप, जिरे आणि मीठ इत्यादी साहित्य लागते. तुम्ही यात तुमच्या आवडीचे पदार्थ देखील टाकू शकता.

Bhoplyache Soup | yandex

भोपळा

भोपळ्याचे सूप बनवण्यासाठी सर्वप्रथम भोपळ्याची साल काढून त्याच्या बारीक फोडी करून घ्या. जास्त मोठी काप करू नका.

Pumpkin | yandex

कांदा

कुकरच्या भांड्यात भोपळ्याच्या फोडी, चिरलेला कांदा, सोललेला लसूण, हिरवी मिरची, आलं, जिरे टाकून मध्यम आचेवर ४ ते ५ शिट्ट्या करून घ्या.

Onion | yandex

पेस्ट बनवा

उकडलेले पदार्थ थंड झाले की, ते सर्व मिक्सरमध्ये वाटून एक पातळ पेस्ट करून घ्या. तयार पेस्ट एका बाऊलमध्ये काढून त्यात पाणी टाकून मिक्स करा.

Bhoplyache Soup | yandex

मीठ

आता एका पॅनमध्ये मीठ टाकून सर्व सूप छान उकळून घ्या. गॅस मध्यम आचेवर ठेवून द्या. सूपाचा सुगंध येईल.

Salt | yandex

कोथिंबीर

शेवटी हिरवीगार कोथिंबीर टाकून गरमागरम सूपचा आस्वाद घ्या. तुम्हाला सर्दी - खोकला झाला असेल तर हे सूप रामबाण उपाय आहे.

Coriander | yandex

फायदे

भोपळ्यामध्ये भरपूर जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्स असतात. जे वजन कमी करण्यास, पचन सुधारण्यास आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात.

Bhoplyache Soup | yandex

NEXT : भाकरी अन् झणझणीत शेवग्याच्या शेंगांची भाजी, एक घास खातच येईल गावाची आठवण

Shevgyachya Shenganchi Bhaji Recipe | yandex
येथे क्लिक करा...