Shreya Maskar
शेवग्याच्या शेंगांची मसाला भाजी बनवण्यासाठी शेवग्याच्या शेंगा, हळद, मीठ, उकडलेले बटाटे, खडे मसाले , सुकं खोबरं, आलं, लसूण, कोथिंबीर, कढीपत्ता, कांदा, टोमॅटो, लाल तिखट मसाला, गरम मसाला, कांदा-लसूण मसाला, शेंगदाणा कूट इत्यादी साहित्य लागते.
शेवग्याच्या शेंगांची मसाला भाजी बनवण्यासाठी सर्वप्रथम एका भांड्यात पाणी गरम करून त्यात थोडं मीठ आणि हळद घाला. त्यानंतर या पाण्यात शेवग्याच्या शेंगांचे तुकडे शिजायला ठेवून द्या.
आता मिक्सरच्या भांड्यात सुकं खोबरं, लसूण , आलं, कोथिंबीर एकत्रित करून एक वाटण वाटून घ्या.
पॅनमध्ये तेल गरम करून त्यात खडे मसाले टाकून फोडणी द्या. फोडणी तडतडू लागली की, बारीक चिरलेला टोमॅटो, कांदा घाला. त्यानंतर वाटलेले खोबऱ्याचे वाटण टाका.
त्यानंतर भाजीमध्ये हळद, धणे पूड, लाल तिखट मसाला, गरम मसाला, कांदा- लसूण मसाला घालून मिक्स करा.
भाजीची चव वाढवण्यासाठी यात जाडसर शेंगदाणा कूट घाला आणि एक उकळी काढून घ्या. भाजी शिजवताना गॅस मंद आचेवर ठेवून द्या.
शेवटी यात उकडलेले बटाटे आणि शिजलेल्या शेंगा टाकून भाजीला ७-८ मिनिटे चांगले शिजवा. त्यानंतर त्यावर हिरवीगार कोथिंबीर भुरभुरवा.
गरमागरम भाकरीसोबत शेवग्याच्या शेंगांची मसाला भाजी खा. हा पदार्थ लहान मुलं देखील आवडीने खातील. यात तुम्ही खाताना वरून शेव देखील टाकू शकता.